आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कर्मचाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शिरपूर तालुक्यातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. नासीर पठाण असे पोलिसाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने पठाण याला ताब्यात द्या, अशी मागणी केली. संतप्त जमावाने पोलिस ठाण्याच्या दिशेने दगडफेक केल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी त्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. याप्रकरणी पठाणच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.    पीडित मुलीची ६५ वर्षीय आजी शाळेजवळ गोळ्या-बिस्किटांची विक्री करते. या ठिकाणी पीडित मुलगी बसली असताना सकाळी नासीर खान पठाण आला. त्याने मुलीचा विनयभंग केला. तसेच या प्रकाराची वाच्यता करू नये, अशी धमकी तिला दिली. दरम्यान, या घटनेनंतर जमावाने पठाण याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.  त्यानंतर जवळपास ५०० जणांचा जमाव  पोलिस ठाण्याबाहेर गोळा झाला.  दरम्यान, पोलिस कर्मचारी पठाणविरोधात अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी आल्या असून त्याच्यावर  कोणतीही कारवाई होत नसल्याचा अनेकांनी आरोप केला.

बातम्या आणखी आहेत...