आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीकाठी हाेणाऱ्या रस्ता कामाच्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- पांझरा नदीकाठावर रस्त्याचे काम सुरू करण्यात अाले अाहे. देवपुरातील नकाणे राेडवरील वेदांत मंगल कार्यालयामागे ररस्त्याचे काम सुरू अाहे. तेथील सार्वजनिक शाैचालयामागील खड्ड्यामध्ये साचलेल्या सांडपाण्यात टायर खेळताना अाठ वर्षीय बालक पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी दाेन ते तीन वाजेदरम्यान घडली. 


एकवीरा नगरातील दगडकाम करणाऱ्या कुटुंबातील कृष्णा श्यामा शिराळे हा दुसरीतील विद्यार्थी एका मित्रासाेबत टायर खेळत हाेता. तर त्याचे अाई-वडील दगड कामासाठी तालुक्यातील शिरूड येथे गेले हाेते. या ठिकाणी राहणाऱ्या अाणि धुणीभांडी करणाऱ्या अात्याकडे कृष्णा हाेता. घटना घडली तेव्हा त्याची अात्या परिसरात धुणीभांडी करण्यासाठी गेली हाेती. हा मुलगा पाण्यात बुडाला. त्या ठिकाणी सांडपाणी कामामुळे निघालेल्या मातीचा चिखल झाल्याने कृष्णा त्यात रुतला. 


याची माहिती त्याच्याबराेबर खेळणाऱ्या लहान मुलाने धावत येत त्याच्या वडिलांना सांिगतली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी नदीकडे धाव घेत मुलाचा शाेध घेतला. मात्र मुलाने कृष्णा नदीत नव्हे ते खड्ड्यात बुडाल्याची जागा दाखविली. त्यानंतर नागरिकांनी मदतीने त्याला बाहेर काढले. मात्र त्याचा मृत्यू झाला हाेता. घटनेची माहिती दाेन तासांनी पश्चिम देवपूर पाेलिसांना समजली. त्यानंतर सहायक पाेलिस निरीक्षक सरिता भांड अाणि कर्मचारी अाले. कृष्णा हा चार बहिणींच्या पाठीवर झालेला एकुलता एक मुलगा हाेता. 


घटनेनंतर खड्डा बुजवला… 
घटनेनंतरयाठिकाणी असलेल्या खड्डा काम करणाऱ्यांकडून बुजविण्यात अाला. जेसीबीच्या मदतीने त्यावर माती टाकून खड्डा बुजविल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून देण्यात अाली. 

बातम्या आणखी आहेत...