आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंबड्याने केलेल्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी; खासगी रुग्णालयात उपचार सुरु

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा (जळगाव)- कोंबड्याने केलेल्या हल्ल्यात घरसमोरील अंगणात खेळत असलेला बालक गंभीर जखमी झाल्याची घटना पाटोदा तालुक्यातील बांगरवाड शिवारात घडली. सिताराम सुरेश सस्ते असे कोंबड्याच्या  हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. 

 

पाटोदा तालुक्यातील बांगरवाडी येथील शिवारात शेतकरी सुरेश सस्ते हे राहतात. त्यांनी शिवारात कोंबड्या पाळल्या असुन यातील एक कोंबड्याने शुक्रवारी सस्ते यांचा लहान मुलगा सिताराम हा अंगणात खेळत असतांना त्याच्यावर अचानक हल्ला केला. चेहऱ्यावर कोंबड्याने चोची मारल्याने  हा बालक गंभीर जखमी झाला. कुटूंबातील लोकांनी या बालकाला  पाटोदा येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बालकाच्या चेहऱ्यावर दहा टाके घेण्यात आले आहेत. या प्रकारामुळे  सस्ते यांच्या घरासमोरून जाण्यास ग्रामस्थांना भिती वाटत आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडिओ

बातम्या आणखी आहेत...