आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा तासांत रुळांवरून हटवला मालगाडीचा घसरलेला कंटेनर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- येथील रेल्वे यार्डातील मालधक्क्यावर साेमवारी सकाळी ९ वाजता गॅसचे रिकामे टँकर (मालगाडीचा डबा) रुळावरून घसरले. या अपघाताची माहिती मिळताच डीआरएम आर.के.यादव यांनी यार्ड गाठून घटनेची माहिती घेतली. यानंतर युद्धपातळीवर कामाला लागलेल्या यंत्रणेने दुपारी ३.१५ वाजेपर्यंत डबा उचलून मार्ग मोकळा केला. 


येथील रेल्वे यार्डातील कंटेनर डेपाेजवळ रेल्वे मालधक्का आहे. सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास खंडव्याकडून भुसावळ रेल्वे यार्डात येणाऱ्या मालगाडीतील गॅसचे रिकामे कंटेनर असलेला डबा रुळावरून खाली घसरला. हा डबा बाजुच्या मार्गापर्यत घसरत गेल्याने खळबळ उडाली. या अपघाताची माहिती मिळताच महाबली क्रेन घटनास्थळी बोलावण्यात आले. यानंतर पथकाने क्रेनच्या सहाय्याने खाली घसरलेल्या कंटेनरचा डबा उचलून पुन्हा रुळावर ठेवला. मात्र, या प्रक्रियेसाठी तब्बल सहा तास मेहनत घ्यावी लागली. तत्पूर्वी, अपघातानंतर धोक्याची सूचना देणारे सायरन वाजताच विभागातील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. अपघातस्थळी निरीक्षण करून नेमक्या काय उपाययोजना कराव्या लागतील? याचे नियोजन केले. 


डीअारएम यादव यांची पाहणी 
अपघाताची माहिती मिळताच डीअारएम अार.के. यादव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना साेबत घेत मालधक्का गाठला. अपघातस्थळी पाहणी करत डॅमेज झालेला रेल्वे रूळ बदलण्याची सूचना केली. यानंतर डीअारएम यादव यांनी कार्यालयातील मुख्य कंट्राेल रूम गाठले. अपघातग्रस्त डबा उचलून मार्ग वाहतुकीला खुला होईपर्यंत ते कंट्रोल रुममध्ये बसून होते. 


कारणांचा शोध सुरू 
सकाळी रेल्वे यार्डात झालेल्या अपघाताचे कारण अद्याप समजले नाही. मात्र, अधिकाऱ्यांना अपघाताचे कारण शोधावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. यार्डातील या घटनेमुळे रेल्वे दळणवळणावर कोणताही परिणाम झाला नाही. 
- अार.के. यादव, डीअारएम 

बातम्या आणखी आहेत...