आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये सायबर क्राइमच्या तक्रारींमध्ये वर्षभरात दुपटीने वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे सावधानता न बाळगल्याने सायबर क्राइमचे आव्हान उभे ठाकले असून या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली अाहे. गेल्या पाचच महिन्यात सायबर क्राइम संदर्भात तब्बल ६० तक्रारी नोंदवण्यात आल्या आहे. 

 

'मी बंॅकेतून व्यवस्थापक बोलतो... तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे... एटीएम सुरू ठेवण्यासाठी एटीएम क्रमांक व पासवर्ड द्या...' अशी विचारणा करुन ऑनलाइन फसवणूक करण्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले अाहे. सर्रास अशी फसवणूक हाेत असतानाही नागरिक अजूनही भामट्यांना एटीएमचा ओटीपी सांगत आहेत. विशेष म्हणजे ऑनलाइन फसवणूक झालेल्या गुन्ह्यांमध्ये स्टेट बंॅक ऑफ इंडियाच्या ग्राहकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या पाठोपाठ सोशल मीडियावर अश्लील, महापुरुषांबद्दल, राजकारण्यांबाबत आक्षेपार्ह संदेश पाठवण्याच्या तक्रारीही वाढत आहेत. बंॅक खात्यातून ऑनलाइन खरेदी करण्यात आलेल्या तक्रारींचाही समावेश आहे. शिवाय तुम्हाला जॅकपॉट लागणे, नोकरीचे अमिष देणे, बक्षीस लागणे आदी अमिष देऊन भामटे त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करायला लावून नागरिकांची फसवणूक करीत आहेत. या प्रकारचे अनेक गुन्हे जिल्ह्यात घडलेले आहेत. या प्रकरणात पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 


फसवणुकीचे सव्वाचार लाख केले परत : जिल्हा पोलिस दलाच्या सायबर सेलकडे गेल्या वर्षी सायबर क्राइम संदर्भात १०२ तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या तुलनेत गेल्या पाच महिन्यांत ६० तक्रारी करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या सरासरीच्या तुलनेत तक्रारींमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे. या ६० प्रकरणांमध्ये नागरिकांची २२ लाख ७ हजार ६३४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झालेली आहे. यापैकी सायबर सेलने १६ प्रकरणांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांचे ४ लाख २८ हजार ६४९ रुपये परत मिळवून दिले आहेत. 


४८ तासांच्या आत तक्रार करा 
ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर ४८ तासांच्या आत सायबर सेलकडे तक्रार केल्यास पैसे परत मिळण्याची शाश्वती असते. अशा प्रकारे तक्रार केल्यास सायबर सेल संबंधित बंॅकेला तसेच संबंधित कंपनीला पत्र देऊन ती रक्कम गोठवण्यात येते. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या भामट्याला ती रक्कम काढता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी फसवणूक झाल्यानंतर ४८ तासांच्या आत तक्रार द्यावी, असे आवाहन सायबर सेलतर्फे करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...