आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेतलेल्या स्थितीत महामार्गावर टँकरमध्ये आढळला युवकाचा मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- मुंबई-अाग्रामहामार्गावर असलेल्या चाळीसगाव चाैफुली परिसरातील हाॅटेल कुणालजवळील एका गॅरेजसमोर उभ्या असलेल्या टँकरच्या केबिनमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत युवकाचा मृतदेह अाढळला. बबलू संताेष उचाळे (वय २२) रा. उचाळे वस्ती, गुरुद्वारामागे असे या युवकाचे नाव आहे. मृत युवक संबंधित गॅरेजमध्ये काही दिवस कामाला हाेता. युवकाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत त्याच्या मृत्यूची चाैकशी करावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली. या घटनेची पाेलिसांत नोंद करण्यात आली असल्याची माहिती देण्यता आली. 


शहरातील चाळीसगाव चाैफुलीनजीक असलेल्या हाॅटेल कुणालच्या शेजारी नीलेश गॅरेज आहे. या ठिकाणी रविवारी काही ट्रक उभे हाेते. त्यापैकी काही दुरुस्तीसाठी अाले हाेते. त्यातील एका टँकरच्या (क्र.एमएच ०४-सीजी ६८०६) केबिनमध्ये रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बबलू उचाळे हा गळफास घेतलेल्या स्थितीत अाढळून अाला. गॅरेज मालक उदय वसंत सूर्यवंशी गॅरेजमध्ये काम करणारे अाबा मिस्त्री हे सकाळी गॅरेजमध्ये अाले त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. 


बबलू काही दिवसांपूर्वी नीलेश गॅरेजमध्ये कामाला असल्याने त्याला संबंधितांनी अाेळखले. त्यानंतर त्यांनी तत्काळ चाळीसगाव राेड पाेलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. ताेपर्यंत बबलूचे नातेवाईकही घटनास्थळी अाले. चाळीसगाव राेड पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर अाहेर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. 


या वेळी बबलूच्या नातेवाइकांनी त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून याप्रकरणी चाैकशी करत खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. दुपारी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर बबलूचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात अाला. याबाबत चाळीसगाव राेड पाेलिस ठाण्यात उदय वसंत सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद झाली. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याने गळफास घेतला की त्याचा घातपात झाला हे स्पष्ट होईल. मात्र बबलू तेथे कसा अाला, त्याला येताना काेणी पाहिले का अादी अनेक प्रश्न गुलदस्त्यात आहेत. उपनिरीक्षक अाहेर तपास करीत अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...