आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीबाबत निर्णय साेमवारनंतर शक्य; पोटनिवडणुकीमुळे विलंब, कार्यकर्त्यांचे लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेत भाजप व शिवसेनेच्या युतीसंदर्भात अाता २८ मे नंतर बैठक हाेणार अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी अामदार सुरेश जैन यांच्या भेटीतील महत्वाचा दुवा असलेले मंत्री गिरीश महाजन हे पालघर लाेकसभा पाेटनिवडणुकीच्या प्रचारात गुंतले असल्याने युतीसंदर्भात चर्चेचे सोपस्कार अद्यापही पूर्ण हाेऊ शकलेले नाही. माजी अामदार जैन यांनी देखील साेमवारनंतर युतीसंदर्भात निर्णय हाेण्याचे संकेत दिले अाहेत. 


महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी खान्देश विकास अाघाडी व विराेधक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे युती संदर्भातील बोलणीकडे लक्ष लागून आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून युतीला स्पष्ट विराेध हाेत अाहे. तर खाविअाकडून विकासाच्या मुद्द्यावर युतीला प्राधान्य दिले जात अाहे.

बातम्या आणखी आहेत...