आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपक पाटील खूनप्रकरण; तिसऱ्या संशयितास अटक; मृताच्या एटीएममधून पैसे काढल्याने मिळाले पुरावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अमळनेर शहरातील दीपक देवरात पाटील यांच्या खून प्रकरणात गुरूवारी (१७ मे) पोलिसांनी तिसरा संशयित विजय उर्फ गण्या डेढे (रा. बदलापुर, मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 


३ मार्च २०१८ रोजी रात्री १० वाजता दीपक पाटील यांना गण्यासह राज वसंत चव्हाण व राबिया बानो या तिघांनी लाकडी दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर त्यांनी पाटील यांच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल, एटीएम कार्ड लांबवले होते. काही नागरिकांनी पाटील यांना रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पाटील हे मृत झाल्यानंतर देखील काही दिवसांची त्यांच्या एटीएम कार्डमधून दोन वेळा पैसे काढण्यात आले होते. वाशीम येथील हे एटीएम केंद्र होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित एटीएम केंद्रातून सीसीटीव्ही फुटेज मिळवले होते. 

 

यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी रफिक शेख, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, उपनिरीक्षक गोकुळ पाटील, किशोर पाटील, सुनिल पाटील, प्रमोद बागडे यांनी वाशीम कारंजा गाव गाठले. तेथून चव्हाण व राबिया बानो यांना ताब्यात घेतले. तर दुसऱ्याच दिवशी गण्या याला ही ताब्यात घेतले आहे. तिघांना २५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पथकास १० हजारांचे बक्षीस जाहिर केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...