आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोंडाईचात चिमुकलीवर अत्याचार; तेली समाजाचा राज्यभर आंदोलनाचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- दोंडाईचा येथील पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीवर विद्यालयाच्या आवारात अत्याचार करण्यात आला होता. ही घटना 8 फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेचा गुरूवारी (दि. 22) यावल तालुका तेली समाज उन्नती मंडळातर्फे निषेध करण्यात आला. तहसिल कार्यालयात व पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. 

 


दोंडाईचा येथे दि. 8 फेब्रुवारी रोजी ज्ञानोपासक शिक्षण मंडळ संचालित नूतन माध्यमिक विद्यालयात पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीवर विद्यालयाच्या आवारात चॉकलेटचे आमिष देऊन एका अज्ञात नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना विद्यालयाच्या आवारात घडली होती.

 

 

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

या घटनेनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या सांगण्यानुसार शिक्षण मंडळाच्या संचालकांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा प्रकार घृणास्पद व माणुसकीला काळिमा फासणारा असुन अशा नराधमांवर कठोर कारवाई केली पाहिजे. पीडित बालिकेच्या आई-वडीलांना संरक्षण द्यावे, अशा मागणीचे निवेदन यावल तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्या वतीने देण्यात आले. मंडळाचे पुंडलीक जावरे, यावलचे नगरसेवक अभिमन्यु चौधरी, डॉ. गणेश रावते, दगडू मंदवाडे, भागवत रावते, अरूण मंदवाडे, भिकन रावते, मनोज करणकाळ, अविनाश निळे, रूपचंद रावते, सुधीर चौधरी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांची उपस्थिती होती. या प्रकरणात जर कारवाई झाली नाही तर तेली समाजातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

 


पुढील स्लाईडवर वाचा तेली समाजाच्या काय आहेत मागण्या

बातम्या आणखी आहेत...