आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापुरजवळ बनावट दारुची 800 खोके भरलेला ट्रक पकडला; आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर (नंदुरबार)-  नवापूर येथून मध्य प्रदेशकडून गूजरातकडे जाणार्‍या बनावट देशी दारूच्या बाटल्यांचे 800 खोके भरलेला ट्रक शनिवारी सकाळी दहा वाजता नवापूर सीमा तपासणी नाक्या जवळील महाराष्ट्र-गुजरात बोर्डरवर गुप्त माहिताच्या आधारे नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी पकडला. दारूचा भरलेला ट्रकचा पंचनामा केला असता 34 लाखांची बनावट दारू व 8 लाखांचा ट्रक असा एकूण 42 लाखांचा मुद्देमाल आढळून आला. नवापूर पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या कारवाईतून नंदुरबार जिल्ह्यातील सुस्त असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरू आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईत दोन जणांना अटक केली असून मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिस घेत आहेत. 

 

अशी झाली कारवाई

गुजरात राज्यात विधानसभा निवडणुक सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात आहे. दारूचा ट्रक महामार्गाने गुजरातकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर नवापूर तालुक्यातील हद्दीत ट्रकचा पाठलाग करण्यात आला. ट्रकचालकाला शंका आल्यास तो पळ काढू नये म्हणून अनेक ठिकाणी सापळे रचण्यात आले होते. नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा येथील सीमावर्ती भागात ट्रक थांबताच नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या पथकाने ट्रकचा ताबा घेतला. यात ट्रक चालक सलिम सहाबुद्दीन (वय 45, रा.152/2 जुना रिसाला, इंदुर, मध्यप्रदेश) ट्रक चालक सोहेल साहिद खान (वय 25, रा. रा.सुभाषनगर, रतलाम, मध्यप्रदेश) या दोन जणांना अटक करण्यात आली.

 

40 हजार दारूच्या बाटल्या जप्त 

मध्य प्रदेश पासिंग असलेल्या एमपी -11 एच 0886, या क्रमांकाच्या ट्रकमध्ये भुसीच्या मागे लपवून दारूचे सुमारे 800 खोके भरलेले होते. त्यात बॉम्बे स्पेशल व्हिस्कीच्या 40 हजार बाटल्या आढळल्या. त्यावर मध्य प्रदेशमध्ये उत्पादित केलेली दारूच्या खोक्यावर विक्रीकरिता असे शिक्के आहेत.

 

यांनी केली कारवाई
नंदुरबार पोलिस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत व सहकारी सहायक पोलिस निरीक्षक दिपक पाटील, व पोलीस कर्मचारी राजेंद्र सोनवणे योगेश थोरात, महेंद्र नगराळे, आदीनाथ गोस्वामी, कृष्णा पवार, रितेश हंदवे, जितेंद्र तोरवणे, महेश पवार, गणेश सोनवणे आदींनी कारवाई केली. नवापूर पोलिस ठाण्यात पंचनामा करून पोलिसांनी माल ताब्यात घेतला.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...