आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अापल्यात जशी निर्माण करण्याची धमक तशी भस्मसात करण्याचीही; खडसेंचा पुन्हा भाजपला इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- ‘लेवा पाटीदार- पटेल समाजात पंतप्रधान हाेण्याची क्षमता अाहे. लाेहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात ती हाेती, हे इतिहासाचा धांडाेळा घेतल्यावर सहज लक्षात येते. मात्र, राजकारणात पात्र माणसाला केव्हा बाजूला सारले जाईल अन् पात्रता नसलेली व्यक्ती पुढे येईल याचा काही नेम नाही. अापल्यात जशी निर्माण करण्याची धमक अाहे तसेच ते भस्मसात करण्याचीही अाहे,’ असा गर्भित इशारा भाजपचे नाराज नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी (दि.४) स्वपक्षीयांना दिला.  


यावल तालुक्यातील पाडळसे येथे लेवा पाटीदार समाजाच्या चाैथ्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बाेलत हाेते. व्यासपीठावर या समाजाचे तीन अामदार, पाच माजी अामदार, एक खासदार, दाेन माजी खासदार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित हाेते. ३३ वर्षांनंतर हाेणाऱ्या या महाअधिवेशनाचे उद्घाटन शंखनाद करून पाच युवतींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने  झाले. सलग ५२ वर्षे समाजाचे कुटुंबनायक पदाची जबाबदारी सांभाळणारे रमेश विठू पाटील यांचा सपत्नीक गाैरव करण्यात अाला. अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या अध्यक्षपदी ललित पाटील यांची निवड जाहीर करण्यात अाली. तसेच कुटुंबनायकांना समाजाच्या कार्यासाठी एक चारचाकी व दुचाकी भेट देण्यात अाली.  


‘उमवि’ला बहिणाबाईंचे नाव द्या : खडसे  
- देशासह राज्यभरात अस्मिता जपण्यासाठी विद्यापीठांना वेगवेगळी नावे देण्यात अाली अाहेत. कवयित्री बहिणाबाई चाैधरी या कुठल्याही एका समाजाच्या नव्हे, तर खान्देशाची अस्मिता अाहेत. म्हणून त्यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देण्यात यावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार.  
- निर्णय प्रक्रियेत अापल्या समाजाला विचारात घेतले पाहिजे, अशी ताकद दाखवावी लागेल. त्यासाठी राजकारणाचे जाेडे बाजूला काढून संघटित व्हावे लागेल.  
- लेवागणबाेलीच्या संवर्धनासाठी  प्रयत्न करू. १७ एकर जागाही बसण्यास अपुरी पडणे ही अधिवेशन यशस्वी झाल्याची फलश्रुतीच अाहे.  
- हे व्यासपीठ सामाजिक अाहे. म्हणून राजकीय विषय मांडणे याेग्य वाटत नाही. मात्र, अन्याय झाला तर ताे सहन न करता त्याच्याविराेधात अावाज उठवणे हा अापला स्थायिभाव अाहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘बेटी बचाअाे, बेटी पढाअाे’चाे जाे नारा दिला अाहे ताे लेवा समाजाने गांभीर्याने घेतला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...