आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अन्याय’ फलकाच्या रिक्षात एकनाथ खडसेंचा फेरफटका; कार्यकर्त्यांमध्ये अन्यायाची भावना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- भाजपचे नेते, अामदार एकनाथ खडसे यांचा फाेटाे लावून त्यावर ‘अन्याय’ असा फलक झळकवणाऱ्या रिक्षातून एकनाथ खडसे यांनी फेरफटका मारला. कार्यकर्त्यांमधूनही अापल्यावरील अन्यायाला वाचा फुटत अाहे, असा मार्मिक टाेलाही त्यांनी लगावला. खडसेंवरील अन्याय अन् रिक्षेवरील अन्यायाची चर्चा मात्र शहरात सुरू झाली.


शहराच्या दाैऱ्यावर अाले की, एकनाथ खडसे सहकारी कार्यकर्त्यांशी संपर्क साधतात.  बुधवारीही त्यांनी डाेंगरे महाराज नगरात असाच संपर्क केला. मात्र या वेळी एक रिक्षा त्यांच्यासाठी व कार्यकर्त्यांसाठीही अाैत्सुक्याची ठरली. अमळनेर येथील रिक्षाचालक कैलास चौधरी यांनी रिक्षेच्या मागील बाजूने फलक झळकवून एकनाथ खडसे यांच्या अन्यायाला वाचा फाडण्याचे काम केले. याच रिक्षामधून एकनाथ खडसे यांनी फेरफटका मारला. रिक्षातून त्यांनी काही अंतर प्रवास केला. अमळनेरचे कैलास चौधरी यांच्या रिक्षाच्या मागे एकनाथराव खडसे यांचा फोटो आहे. त्याचप्रमाणे ‘अन्याय’ शब्द लिहिला आहे. आमदार एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरून बाजूला केले. त्यामुळे त्यांच्यावर पक्षात अन्याय झाल्याची भावना जनमानसात होती. त्याचेच प्रतिबिंब म्हणून कैलास चौधरी यांनी त्यांच्या रिक्षावर फोटो आणि ‘अन्याय’ असे लिहिले आहे. कैलास चौधरी हे नाशिकला जात असताना त्यांना एकनाथराव खडसे धुळ्यात अाल्याचे समजल्यावर पारोळा रोडवरील डोंगरे महाराज नगरात त्यांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी रिक्षाचालक कैलास चौधरी यांच्या आग्रहास्तव व कार्यकर्त्याच्या भावना समजून घेत त्यांच्या रिक्षातून काही अंतर प्रवास केला. या वेळी त्यांच्यासोबत सुनील नेरकर होते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...