आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

५० वर्षांची दुकाने ६ तासांत जमीनदाेस्त; व्यापाऱ्यांचा वाद, सहा जणांना पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिकेच्या नवीन इमारती समाेरील व्यापारी संकुल बुधवारी जमीनदाेस्त करण्यात अाले. ५० वर्षांपूर्वी या संकुलात अाेळीने उभारलेली २५ दुकाने पाडण्यात अाली. त्याचबराेबर संताेषी माता मंदिराजवळील टपऱ्याही काढण्यात अाल्या. महापालिका व पीडब्ल्यूडीने ही कारवाई केली. २५ दुकानांसह १० टपऱ्या मिळून दिवसभरात ३५ अतिक्रमणे भुईसपाट करण्यात अाली. त्यासाठी माेठा पाेलिस बंदाेबस्त देण्यात अाला. सकाळी कारवाई सुरू झाली तेव्हा व्यापाऱ्यांनी संघर्षही केला. त्या वेळी वादही झाला. मात्र पाेलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. 

शहरातील तत्कालीन नगरपालिकेने शाळा नंबर एकनजीक रस्त्याच्या कडेला पन्नास वर्षांपूर्वी व्यापारी संकुल उभारले हाेते. या संकुलात २५ दुकाने व्यापाऱ्यांना कराराने दिली हाेती. यातून मनपाला भाडे व मालमत्ता कराची रक्कम मिळत हाेती. या परिसरातील शाळा पाडून महापालिकेने तिथे नवीन प्रशासकीय इमारत उभी केली. त्या इमारतीला ही दुकाने अडथळा ठरत हाेती. ही दुकाने काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेला महिन्यापूर्वी नोटीस दिली. व्यावसायिक बांधकाम करताना रस्त्यापासून सहा मीटर अंतर सोडण्याची गरज असते. मात्र व्यापारी संकुल रस्त्यालगतच उभारले हाेते. त्यावर कारवाईचा पवित्रा सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला. त्यानंतर बुधवारी प्रत्यक्ष कारवाई सुरू केली. सकाळी ९ वाजेपासून प्रारंभी साक्री रोडवरील मोती नाल्यापासून रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढले. अतिक्रमित टपऱ्या हटविल्या. त्यानंतर पुढे गुरू-शिष्य स्मारकामागे शाळेनजीक व्यापारी संकुलाचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सकाळी १० वाजता केली. या वेळी व्यापाऱ्यांना दुकानातील साहित्य माल काढण्याची सूचना दिली. दुकाने रिकामी झाल्यावर जेसीबीच्या साहाय्याने ती पाडण्यात अाली. या संकुलातील व्यापाऱ्यांना महापालिकेने काल मंगळवारी सायंकाळी दुकाने रिकामे करण्याची सूचना केली. त्यानंतरही दुकानदारांनी दुकाने सकाळपर्यंत रिकामी केली नव्हती. त्यामुळे अचानक झालेल्या कारवाईला व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागले. त्यांनी दुकानातील साहित्य काढण्यासाठी मुदत मागितली.

 

संताप, शिवीगाळ अन् गाेंधळ 
दुकानाचे अतिक्रमण तोेडताना जेसीबीने दुकानाच्या मागील बाजूने भिंत तोडल्याने दुकानातील फर्निचरचे नुकसान झाले. त्यामुळे संतप्त दुकानदाराने शिवीगाळ केल्याने येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली हाेती. मात्र पोलिसांनी त्या दुकानदाराला तत्काळ ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा कारवाई सुरू झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता डी.बी. झाल्टे, बिपीन जगताप, के.एन.पाटील तसेच तांत्रिक सहायक राहुल पाटील यांच्यासह २५ जणांचा ताफा होता. तर दोन जेसीबी एक पोकलेन व दोन ट्रॅक्टर होते. 


वेळ दिला नाही 
महापालिकेकडून सायंकाळी तोंडी सांगितल्यावर सकाळी प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्याने दुकानातील साहित्य काढण्यासाठी मोठा गांंेधळ उडाल्याने साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांना वेळ द्यायला पाहिजे होता असे येथील व्यापारी तुलसीदास रिजवानी, सुनील कौलसकर व राजेंद्र पिंगळे यांनी सांगितले. व्यापारी संकुल रस्त्याच्या पुढे बांधल्याने कारवाईसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मनपाला नाेटीस दिली होती. त्याची मुदत िद.१४ एप्रिलला संपली आहे. त्यानंतर ही कारवाई झाली. 
 

बातम्या आणखी आहेत...