आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपातील चांगली नोकरी सोडून नाशिक येथील अभियंता चक्क सायकलवर परतला मायदेशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- युरोपातील पेट्रोलियम अभियंता असलेल्या नाशिक येथील एका ध्येयवेड्या तरुणाने ही नोकरी सोडून मायदेशी परतण्याच्या ओढीने सायकल प्रवासाचा मार्ग निवडत तब्बल ३१ देशांची भ्रमंती केली. २४ हजार किलोमीटरचा प्रवास करत या तरुणाने शनिवारी जळगाव गाठले. दोन दिवस जळगावला मुक्काम करून तो २७ रोजी नाशिक येथे पोहोचणार आहे. 


खडतर व रोमांचकारी प्रवासातील अनुभव योगेशने सांगितले. योगेश युरोपमध्ये पेट्रोलियम अभियंता म्हणून नोकरीला होता. नाेकरी साेडल्यानंतर घरी सायकलीवर जाऊ, असे मनात अाले. १९ अाॅगस्ट २०१६ ला पाेर्तुगालमधून त्याने प्रवासास सुरुवात केली. 


सगळीकडे माणसे सारखीच : याेगेश म्हणाला, एकाच चौकटीत आपण जगतो. त्यामुळे इतर पर्यायांचा कधीच विचार करत नाही. मी चाैकटीबाहेर विचार केला. अनेक देशात फिरल्यावर लक्षात आलेे की, सर्व देशांत माणसे सारखीच अाहेत. केवळ अन्य देशांविषयी गैरसमज पसरवले जातात. 


या देशांची केली भ्रमंती... 
योगेश याने या प्रवासात पाेर्तुगालपासून स्पेन, फ्रान्स, इटली, साेल्व्हेनिया, व्हॅटिकन सिटी, क्राेएशिया, अल्बानिया, माेंटेगाे, सर्बिया, बल्गेरिया, जाॅर्जिया, इराण, तुर्केमेनिस्तान, अर्मेनिया, उझबेकिस्तान, तजाकिस्तान, कझाकिस्तान, चायना, मंगाेलिया, चायना लाअाेस, कंबाेडिया, थायलंड म्यानमारमधून बांगलादेशद्वारे भारतात प्रवेश केला. त्यानंतर भारतातील मणिपूर, नागालँड, अासाम, मेघालय, पश्चिम बंगालमार्गे, झारखंड, अाेरिसा, छत्तीसगडमधून महाराष्ट्रात अाला. त्याने या प्रवासात दरराेज ८२ ते १०० किलोमीटरचा प्रवास केला. तो प्रत्येक देशातील वातावरणानुसार आपल्या सायकलिंग प्रवासाची सुरुवात करायचा.

बातम्या आणखी आहेत...