आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला साधा खाऊ देखील आणू शकत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिसगाव ढंढाने येथील कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेले शेतकरी सुकदेव  लांडगे. - Divya Marathi
तिसगाव ढंढाने येथील कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेले शेतकरी सुकदेव लांडगे.

कापडणे (धुळे)- तिसगाव ढंढाने येथील शेतकरी सुकदेव लांडगे (वय 47) यांनी कर्जबाजारीपणामुळे आज (दि.8) दुपारी एक वाजता स्वत:च्या शेताजवळ असलेल्या विहिरीत उड़ी मारून आत्महत्या केली. शेतातील विहिरीत आपल्या पत्नीसमोर त्यांनी विहिरीत उडी मारली यावेळी त्यांच्या पत्नीने आरडाओरड करीत बाजूला शेतात काही काम करत असणाऱ्या लोकांना बोलावले. मात्र ते येईपर्यँत सुखदेव लांडगे यांची प्राणज्योत मालवली होती.

 


 अवघ्या चार बिगा शेतीवर आपला संसाराचा गाडा सुखदेव लांडगे ओढत होते. सध्या त्यांनी त्यांच्या शेतात मुळा लावला होता. ते पीक जगवण्यासाठी ते रात्र-दिवस पिकाला पाणी देत होते. त्यांच्या सोबतीला त्यांच्या पत्नीसह त्यांचा बारा वर्षाचा मुलगा देखील राबराब राबत होता.         शेतात येणाऱ्या समस्या व सततची नापिकी, बँकेचे कर्ज या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर एक लाख पंचवीस हजार रुपये कर्ज असल्याचे सांगण्यात येते. आर्थिक विवचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल त्यांनी उचलल्याचे म्हटले जात आहे. कर्जबाजारीपणामुळे लांडगे हे चिंतेत होते.

 


बोंड अळीचा फटका, बाजार भावाचा प्रश्न
शेतातील कापूस पिकाला आधी बोंड अळीचा बसलेला फटका बसल्याने त्यांनी त्यानंतर त्यांनी शेतात मुळा लावला होता मात्र त्याला सुध्दा योग्य बाजार भाव मिळाला नाही. यामुळे ते पूर्णपणे खचून गेले.

 

 

खाऊ देखील आणू शकत नसल्याने पत्नीजवळ रडले

आपण आपल्या कुटूंबासाठी व मुलासाठी खाऊ देखील आणू शकत नाही, असे त्यांनी रात्री आपल्या पत्नीला अश्रू ढाळत सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...