आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरणगावी मुलीच्या लग्नाच्या पूर्वसंध्येला वडिलांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - मुलीच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या वरणगाव येथील पित्याचा मुलीच्या लग्नाच्या पूर्वसंध्येला हृदयविकाराने मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी अचानक प्रकृती बिघडल्याने वधू पित्याला जळगाव येथील दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र, मुलीच्या डोक्यावर मंगल अक्षता टाकण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. 

 

वरणगावच्या झांबरे वाड्यातील दूग्ध व्यावसायिक किशोर सुखदेव झांबरे (वय ५१) यांची मुलगी पूजा हिचा आसोदा येथील रहिवासी भूषण चौधरी यांच्याशी शुक्रवारी (दि.२०) जळगाव येथे विवाह होता. या विवाहामुळे नातेवाईकांनी घर हाऊसफुल्ल झालेल्या संपूर्ण झांबरे कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण होते. काऊ-चिऊचा घास भरवून मोठ्या केलेल्या सोनपरीच्या लग्नाची किशोर झांबरे यांना अप्रुप होते. मात्र, गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास किशोर झांबरे यांना उलटी होऊन अत्यवस्थ वाटायला लागले. यामुळे कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जळगाव येथे खासगी रूग्णालयात हलवले. येथे उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. झांबरे यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. गुरुवारी रात्री ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...