आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किनगावात वनविभागाने 70 हजाराचे अवैध सागवान लाकूड पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- तालुक्यातील किनगावात वनविभागाच्या गस्ती पथकाने गुप्त माहितीनुसार केलेल्या कारवाईत सुमारेे 70 हजाराचे सागवान लाकूड पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.6) करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध सागवान लाकूडचा उद्योग करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 


किनगावात सातपुड्यातुन अवैधरित्या सागवान लाकुड जमा करणे व नंतर त्यापासून फर्निचर तयार करून जिल्ह्यासह राज्यभरात ते अवैध मार्गाने विक्री करणे याचा याचा मोठा उद्दोग चालतो. या संदर्भातील गुप्त माहिती प्रादेशिक वनविभाग, यावल गस्ती पथकाचेे वनक्षेत्रपाल एस. अार. पाटील यांना मिळाली होती. तेव्हा त्यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता वनरक्षक एस.एस.माळी, जगदिश ठाकरे, संदिप पंडीत,संदिप भोई, समिर तडवी व योगीराज तेली या पथकासह किनगावात ठिकठिकाणी तपासणी केली. त्यात गावातील लेंडी नाल्यात झाडा- झुडपामध्ये सागवान लाकडाचे कट साईज लाकुडच्या रिफा, पाट्या व कटसाइज असे एकुण ६६०.२१ घनमिटर सागवान बेवारस मिळून आले. या सागवानाची किंमत सुमारे 70 हजार रूपये आहे. जप्त केलेला मुद्देमाल यावल उपवन केंद्रात जमा करण्यात आले आहे.

 


किनगावात खळबळ
किनगावात मोठ्या प्रमाणावर अवैध सागवान लाकडाचा उद्योग आहे. सातपुड्यतुन चोरट्या मार्गाने लाकूड येथे काही फर्निचर व्यावसायिक घेतात व फर्निचर तयार करून जिल्ह्यासह राज्यभरात पोहचवतात. तेव्हा या कारवाईमुळे गावात एकचं खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...