आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकरने लगावली पोलिसाच्‍या कानशिलात; मेमोच्या बदल्यात पैशांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मेमोच्या बदल्यात पैशांची मागणी करणाऱ्या  वाहतूक पोलिसाचा चारचाकी चालकासोबत वाद झाला. वादात चारचाकी चालकाने शिवीगाळ करीत थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता जळगावातील कालिंका माता चौकात घडली. 

 
 कालिंका माता चौकात ड्यूटीवर असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने एका चारचाकी चालकाला अडवले. त्याच्याकडे कागदपत्रे व लायसन्सची मागणी केली. चालकाने कागदपत्रे दाखवल्यानंतरही वाहतूक पोलिसाने त्याच्याकडे १ हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाहतूक पोलिसाने चालकाची मान पकडल्यामुळे दोघांमध्ये जाेरात झटापट सुरू झाली. यात चारचाकी चालकाने थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली. ही घटना सुरू असताना रस्त्यावरील इतर वाहनचालकांनी गर्दी करीत हा वाद मिटवला. 
  
चालकाकडे सर्व कागदपत्रे असूनदेखील बेकायदेशीरपणे पैसे मागत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. त्यानंतर चारचाकी चालकदेखील घटनास्थळावरून मार्गस्थ झाला. या प्रकरणाची पोलिस ठाण्यात काेणीतीही नाेंद नव्हती. दरम्यान, चारचाकीचालक जुने जळगाव भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...