आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएमचा पिन काेड विचारुन ठगाने केली अाॅनलाइन लूट, 5 कंपन्‍यांकडून केली खरेदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचाेरा - स्टेट बँकेतून बाेलताेय... अापले अकाउंट क्लाेज हाेतेय...अापल्या एटीएमचा चार अाकडी पिन काेड १६ अाकडी एटीएम नंबर सांगा... असे खाेटे सांगून निवृत्त कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातील पैशाने वेगवेगळ्या पाच कंपन्यांकडून अाॅनलाइन पद्धतीने एका ठगाने ३८ हजार ४९८ रुपयांची खरेदी केली. अापली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खातेदाराचे अवसान गळाले. शहरात अशा पद्धतीने फसवणुकीची ही तिसरी घटना अाहे.

 

प्रकाश विष्णू शिंपी असे या फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव अाहे. ते शहरातील बाजाेरीया नगरमध्ये राहतात. मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने ९१९९३१७४२७ या मोबाइल क्रमांकावरून त्यांना फाेन केला. घाईत असल्याने त्यांनी पहिला काॅल घेतला नाही. पुन्हा १० मिनिटांनी दुसरा काॅल अाला. ठगाने बँकेतून बोलत असल्याचे खोटे सांगून एटीएमबद्दल माहिती घेतली. प्रकाश शिंपी यांनी क्षणाचाही विलंब करता एटीएमचा पिननंबर दिला. काही वेळातच शिंपी हे पाचोरा स्टेट बँक शाखेत पासबुक घेऊन गेले. त्यांनी आलेल्या फोनबाबत चौकशी केली असता बँकेतून असा कुणीच फोन केला नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी आपले पासबुक प्रिंट केले असता त्यांच्या खात्यातून अज्ञात व्यक्तिने पाच वेळा एकूण ३८ हजार ४९८ रुपयांची परस्पर (डेबीट कार्डाद्वारे अाॅनलाइन) खरेदी केल्याची बाब उघडकीस आली.


त्यांनी तत्काळ बँकेच्या अधिकाऱ्यास एटीएम कार्ड लॉक करण्यास सांगितले आणि लगेच पोलिस स्टेशनला त्यांनी धाव घेतली. सायबर गुन्हा पाेलिस अधीक्षकांकडे वर्ग हाेत असल्याने पोलिसांनी शिंपी यांना जळगावला पाेलिस अधीक्षक कार्यालयात पाठवले. तेथे फसवणूक केलेल्या व्यक्तीबद्दल तक्रार दाखल करण्यात अाली. जो ठग मोबाइलवर बोलला तो अगदी शुद्ध मराठी भाषेत गाेड बाेलत हाेता. त्यामुळे शिंपी यांना त्याचे बाेलणे खरे वाटले अाणि त्यांनी एटीएम कार्डावरील १६ अाकडी नंबर सहज देऊन टाकला. त्यामुळे या ही फसगत झाली. या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे.

 

ठगाने केलेला संवाद असा
नमस्कार, मी स्टेट बँकेतून बोलत आहे. आपले अकाउंट बंद होत असून आपल्या एटीएमची मुदतही संपत अाहे. त्यामुळे अापल्या एटीएमचा पिन नंबर सांगा. एटीएमची मुदत वाढवून देतो. अापण चिंता करू नका.

 

वारंवारच्या घटनांनी नागरिकांचे नुकसान
एटीएमचा काेड नंबर मागून फसवणूक केल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत असले तरी अातापर्यंत थेट पैसे एटीएममधून काढले जात असल्याचे प्रकार घडलेय. मात्र पाचाेऱ्यातील प्रकार अाॅनलाइन खरेदीचा असून या प्रकाराने तपास यंत्रणाही चक्रावली अाहे. पाचाेरा शहरात वर्षभरात फसवणूक झाली असल्याची ही तिसरी घटना अाहे. विशेष करून वृद्ध खातेदार महिला खातेदारांची अशा पद्धतीने फसवणूक हाेत असल्याचे मागच्या दाेन, तीन प्रकरणांवरून दिसून अाले. त्यामुळे अधिक सतर्कता बाळगणे गरजचे आहे.

 

अज्ञात व्यक्तीने अशी केली वस्तूंची खरेदी
शिंपी यांच्याकडून एटीएम कार्डावरील १६ अाकडी नंबर घेतल्यावर ठगाने ३८ हजार ४९८ रुपयांची अाॅनलाइन खरेदी डेबीट कार्डने केली. ती खरेदी अशा पद्धतीने झाली- अाेटीएचपीजी एअरटेल मनी - १९ हजार ९९९ रुपये, एफएक्स मार्ट प्रायव्हेट लिमिटेड हजार ९९९ रूपये, अाॅक्सिजन वाॅलेट डाॅट काॅम- हजार रुपये, फस्टीकेट डाॅट इन-५०० रुपये. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास लागून आपली रक्कम परत मिळावी, यासाठी ज्येष्ठ नागरिकाने पोलिस आणि बँकेच्या अधिकाऱ्यांशी बराच वेळ चर्चा केली. तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

जनजागृती करुनही उपयाेग होत नाही
अाम्ही स्टेटबँक खातेदारांना अनेकवेळा अापल्या एटीएमचा नंबर बँकेत खात्री केल्याशिवाय काेणास देऊ नका, असे सांगत अालाे अाहे. त्यासाठी जनजागृतीपर फलकही लावले. यापूर्वीही दाेेनदा अशाच पद्धतीची फसवणूक झाली हाेती. अज्ञात व्यक्तींना काेणतीही माहिती देऊ नका. त्यापेक्षा मी बँकेत जाऊन तपास करताे हेच उत्तर द्या.
- रणजीत कुमार, बँक व्यवस्थापक

 

पाेेलिसांची मदत घ्या
काेणास एटीएम अथवा अाधार कार्ड नंबर विचारण्यासाठी फाेन अाले तर बँकेत कळवा. वेळप्रसंगी पाेलिसांना कळवले तरी चालेल. सायबर क्राइम शाखेला हा गुन्हा उघडकीस अाणण्यासाठी स्थानिक पाेलिस प्रशासन मदत करेल. लाेकांनीच या विषयी काळजी घ्यावी.
- शामकांत साेमवंशी, पाे.निरीक्षक

 

माहिती असूनही फसलो
समाेरून एटीएमचा नंबर मागणाऱ्या गृहस्थाच्या संभाषण काैशल्यामुळे मी फसलाे. असा नंबर मागवून फसवणूक हाेते हे मीही एेकले हाेते. परंतु मीच या जाळ्यात फसलाे. घरी अाल्यावर ताे खाेटा फाेन तर नव्हता ना? अशी शंका अाली होती.
- प्रकाश शिंपी, तक्रारदार

बातम्या आणखी आहेत...