आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेकरीचे अामिष दाखवून 5 काेटींचा गंडा; लष्करी सुभेदारासह 3 अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा- लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून उत्तर महाराष्ट्रातील शेकडाे तरुणांना पाच काेटींचा गंडा घालणाऱ्या लष्करातील सुभेदाराला पत्नी व मुलासह पाचोरा पोलिसांनी रविवारी अहमदनगर तालुक्यातील वाळकी येथे जेरबंद केले. संशयित आरोपीने अनेकांना नोकरीच्या बनावट ऑर्डर दिल्याचा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयाने तिघांचीही पाेलिस काेठडीत रवानगी केली. हसनाेद्दीन चाँदभाई शेख, पत्नी रेश्मा हसनोद्दीन शेख व मुलगा वजीर शेख अशी अाराेपींची नावे अाहेत.   


पाचाेरा शहरातील शिक्षक सचिन धनराज शिरसाठ (रा. भास्करनगर) यांनी त्यांच्या मुलाला लष्करात नोकरी लावण्यासाठी सध्या तवांग (मिझोराम) येथे इंजिनियर रेजिमेंट आर्मीत सुभेदार पदावर कार्यरत असलेला संशयित आरोपी हसनाेद्दीन चाँदभाई शेख (मु.पो. वाळकी, ता. अहमदनगर) यास सन २०१२ मध्ये १२ लाख रुपये दिले हाेते. मात्र, वेळोवेळी संपर्क करूनही मुलास नोकरी मिळाली नाही की पैसेही परत मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी हसनाेद्दीन शेख याच्याकडे पैशाचा तगादा लावला. त्याने पत्नी व त्यांच्या संयुक्त खात्याचे १३ लाखांचे धनादेश दिले. परंतु धनादेश बँकेत टाकू नका, मी लवकरच रोख पैसे देताे, असे ताे सांगायचा. या कालावधीतच धनादेशाची मुदत संपली. आपली फसगत झाल्याची खात्री झाली आणि अखेर सचिन शिरसाठ यांनी पाचोरा पोलिसांत तक्रार दिली हाेती.  


दरम्यान, पाेलिसांनी अाराेपींना पाचाेऱ्यात अाणल्याची बातमी कळताच त्याला पाहण्यासाठी पाेलिस ठाण्यासमाेर माेठी गर्दी झाली हाेती. या वेळीही अनेकांनी फसवणुकीच्या तक्रारी दिल्या. लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध असल्याचे आरोपी इतरांना सांगत होता. त्यामुळे या रॅकेटमधील सर्वांचा पर्दाफाश व्हावा अशी मागणी होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...