आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ सव्वा काेटींचा निधी, 27 कूपनलिका, 117 विंधन विहिरींना मंजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव ग्रामीण मतदार संघात ४१ गावांच्या संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी २७ कूपनलिका व ११७ विंधन विहिरींच्या कामांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या कामासाठी १ कोटी १८ लाख ६० हजार ६४० रुपये निधी उपलब्ध झाला अाहे. 


जळगाव ग्रामीण मधील मंजुर कामांना तत्काळ सुरुवात करण्याच्या सूचना राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या अाहेत. जळगाव तालुक्यात शेळगाव, खेडी, मन्यारखेडा, नांद्रा खुर्द, फुपणी, भादली, गाढोदे, फुपनगरी, देऊळवाडे, लोणवाडी, वसंतवाडी, ममुराबाद, कानळदा, आव्हाणे, असोदा, नशिराबाद व जळके या २३ गावांसाठी १६ कूपनलिका व ४९ विंधनविहीरी मंजूर असून त्याकरिता ६३ लाख १३ हजार ६४५ रुपये तर धरणगाव तालुक्यात भवरखेडे, विवरे, फुलपाट, शेरी, टहाकळी अहिरे बुद्रुक व खुर्द, बोरगाव बुद्रुक, जांभोरे, पथराड बुद्रुक, चमगाव, साळवे, बांभोरी प्रचा, भोद बुद्रुक, पाळधी खुर्द, एकलग्न, निमखेडा, पाळधी बुद्रुक, साकरे, वंजारी बुद्रुक, पिंपळेेसीम, निशाणे, वराड बुद्रुक व खुर्द, मुसळी, चांदसर, लाडली, चोरगाव व कवठड या २८ गावांसाठी ५८ विंधनविहीरी व ११ कुपनलिकांकरिता ५५ लाख ४६ हजार ९८६ इतका निधी मंजूर करण्यात आला. यात मंजुर असलेल्या कामांना तत्काळ प्रारंभ करण्याच्या सूचना राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या अाहेत.

बातम्या आणखी आहेत...