आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठीने अवघ्या पाच तासात मिळून दिले एफडीचे एक लाख ७० हजार रूपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राच्या मार्फत फिक्स डिपॉझिटच्या (एफडी) बनावट पावत्या बनवून १ लाख ७० हजारांची फसवणूक करण्यात अाली. यासंदर्भात दिव्य मराठीने आज मंगळवारी (22 मे) बातमी प्रकाशित केली होती. याची दखल घेत बँकेचे शाखाधिकारी कल्पेश सिंग यांनी अवघ्या पाच तासात नवापूर येथील साई श्रध्दा मेन्स पार्लरचे संचालक उमाकांत देवीदास हिरे यांना एफ डीचे संपूर्ण पैसे परत दिले. 

 

असे आहे संपूर्ण प्रकरण...

येथील साईश्रद्धा मेन्स पार्लरचे संचालक उमाकांत देविदास हिरे यांनी भारतीय स्टेट बँकेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील ग्राहक सेवा केंद्रामार्फत दोन एफडी केल्या होत्या. त्यातील एक एफडी एक लाख रुपयांची (खाते क्रमांक ३७७५६४४६१०५) आहे. ती त्यांनी २६ जानेवारी रोजी काढली होती. दहा टक्के व्याजदराने त्यांनी हे पैसे ठेवले होते. त्यांना देण्यात आलेल्या पावतीच्या पाठीमागे ३०६७६५५३ असा क्रमांक आहे. दुसरी एफडी ७० हजार रुपयांची (खाते क्रमांक ३७२५६०८०६५७) असून, ती त्यांनी २ एप्रिल रोजी काढली आहे. हिरे यांना देण्यात आलेल्या पावतीच्या पाठीमागे ३०६७७७९ असा क्रमांक आहे. त्यांच्या फिक्स डिपाॅझिटची मुदत २६ मार्च २०१८ रोजी पूर्ण झाली. घराचे बांधकाम सुरू झाल्याने त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे उमाकांत हिरे पैसे काढण्यासाठी बँकेत गेले. त्यानंतर ते बँकेतील वसंत ठोसरे यांना भेटले. त्यावेळी हिरे यांच्या खात्यात रक्कम नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हिरे यांनी दाेन महिन्यांपूर्वी शाखाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र त्यानंतरही त्यांना रक्कम मिळाली नाही. बंॅकेच्या एफडीच्या गैरवापर ग्राहक सेवा केंद्र चालकाने केला असले तर शाखा व्यवस्थापकांनी या प्रकरणात पाेलिसात गुन्हा दाखल करण्याची गरज हाेती. परंतु त्यांनी काही कारवाई केली नाही. दरम्यान, ग्राहक सेवा केंद्रामार्फत केल्या जाणाऱ्या व्यवहारांमध्ये नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...