आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीचा दरवाजा लागल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी; बस वाहकाविरोधात तक्रार दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- एसटी बसमध्ये चढतांना वाहकाने ओढलेला दरवाजा विद्यार्थिनीच्या डोक्यास लागल्याने ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी 7 वाजता किनगाव (ता. यावल) बसस्थानकावर घडली. विद्यार्थिनी शाळेत गेल्यावर तिला चक्कर व उलटी आल्याने तिला लगेच जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले. याबाबत चोपडा आगारासह यावल पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

 


चोपडा आगारातुन चोपडा–जामनेर ही बस सकाळी 7 वाजता किनगाव (ता. यावल) येथे बसस्थानकावर आली. किनगावाहून साकळी येथे शिक्षण घेण्यास जाणारी इयत्ता 9 वीची विद्यार्थिनी नुरबानो बी शेख सुपडू (वय 15) ही बस मध्ये चढत होती.  ती पुर्णपणे बसमध्ये दाखल होत नाही तोच बसचे वाहक सी. पी. कोळी यांनी बसचा दरवाजा जोरात ओढला. हा दरवाजा त्या विद्यार्थिनीच्या डोक्याच्या मागील बाजुस लागला. ती बसमध्ये कोसळली, त्यात तिला जबर मुका मार लागला. तिला लागलीच सहविद्यार्थिनींनी सावरले व पाणी दिले. काही वेळात साकळी स्थानकावर बस थांबली व विद्यार्थिनी साकळी गावातील अंजुमने ए इस्लाम उर्दु हायस्कुलमध्ये पोहचली. तेथे तिला पुन्हा चक्कर आली उलटी झाली. तेव्हा तात्काळ तिला यावल ग्रामीण रूग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले. येथे डॉ. रश्मी पाटील , डॉ. अमिर तडवी यांनी प्रथमोपचार केले मात्र, मागील मेंदूला मार लागल्याने उच्चस्तरीय तपासणी करीता विद्यार्थीनीस तात्काळ जळगाव येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असून याबाबत हायस्कुलचे मुख्याध्यापक व विद्यार्थिनीच्या पालकांनी यावल पोलिस ठाणे व चोपडा एसटी आगाराकडे तक्रार केली आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...