आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​दोन हजाराची लाच घेताना हवालदारास अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मळनेर पोलिस ठाण्यातील पातोंडा बिटचे हवालदार संजय श्रावण पाटील. - Divya Marathi
मळनेर पोलिस ठाण्यातील पातोंडा बिटचे हवालदार संजय श्रावण पाटील.

अमळनेर (जळगाव)- जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास शासकीय विश्रामगृहाजवळ अमळनेर पोलिस ठाण्यातील पातोंडा बिटचे हवालदार संजय श्रावण पाटील (वय-48 वर्ष, रा.अमळनेर, जि. जळगाव) यांना लाच घेताना रंगेहात पकडले.

 

 

याबाबत हरीपुरा (ता.यावल) येथील व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने शनिवारी दुपारी जिल्हा परिषद विश्रामगृहाजवळ कारवाई केली 
तक्रारदार यांच्या मोठ्या भावाचा साखरपुड़ा मोडला असुन मुलीच्या पक्षाने केलेल्या तक्रारी अर्जावरुन दोघा पक्षकारांना पोलिस स्टेशनला बोलावत समजुतीचा करारनामा करण्यात आला होता. साखरपुड्यात झालेला खर्च देऊन तड़जोड़ करण्यात आली होती, तो करण्यात आलेला समजुतीचा करारनामा देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून ती रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. लाचलुचपत.प्रतिबंधक विभागाचे जळगाव येथील पोलिस उपअधीक्षक जी.एम. ठाकुर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...