आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका कर्मचाऱ्यांना हाॅकर्सची धक्काबुक्की, फुले मार्केटमध्ये गाेंधळ; जप्त मालाची खेचाखेची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- फुले मार्केटमध्ये मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी दुपारी वाजेच्या सुमारास काही हॉकर्सचे कपड्यांचे गठ्ठे साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे संतप्त झालेले हॉकर्स एकत्रितपणे मनपा कर्मचाऱ्यांवर चालून आले. त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करीत जप्त केलेले गठ्ठे ओढण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जमावाला पांगवले. 


मनपा अतिक्रमण विरोधी पथकातर्फे फुले मार्केटमध्ये गोलाणी मार्केट हाॅकर्समुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, हॉकर्स फुले मार्केटमध्ये बसून व्यवसाय करीत आहेत. आतापर्यंत पथकातर्फे हॉकर्सविरुद्ध अनेक वेळा कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या लोटगाड्या, कपडे इतर वस्तूही जप्त केल्या आहेत. जप्तीच्या कारवाईमुळे हॉकर्स मनपा कर्मचारी यांच्यात शिवीगाळ, बाचाबाची मारहाणीचेही प्रकार यापूर्वी झाले आहेत. या प्रकरणात हॉकर्सविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले. गुरुवारी मनपा अतिक्रमण विरोधी पथकाचे ४० ते ५० कर्मचारी फुले मार्केटमध्ये ट्रॅक्टरसह गेले होते. या कर्मचाऱ्यांना हॉकर्स तेथे कपडे कटलरीची विक्री करताना आढळले. 


हॉकर्सची आरडाओरड
मनपाच्यापथकाने हॉकर्सची तीन कपड्यांची गठ्ठे कटलरी जप्त करून चंदुलाल रसवंतीजवळ ट्रॅक्टरमध्ये टाकत होते. या वेळी संतप्त झालेले हॉकर्स मनपा कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून आले. त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. कर्मचाऱ्यांकडून जप्त केलेले कपड्यांचे गठ्ठे कटलरी ओढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरडही केली. कपडे जप्त केलेला हॉकर्स रडत आरडाओरड करीत होता.

 
हॉकर्सविरुद्ध गुन्हा दाखल
मनपाकर्मचारी शांताराम लक्ष्मण सपकाळे यांच्या फिर्यादीवरून सचिन दामू महाजन याच्यासह इतर तीन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जिन्यावरून पडून एकाचे डोके फुटले 
कारवाईमुळेझालेल्या पळापळीमुळे हाॅकर्स चंद्रकांत महाजन हा जिन्यावरून पाय घसरून खाली पडला. त्यात त्याचे डोके फुटले. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर त्याचे मित्र काही हॉकर्स पोलिस ठाण्यात मनपा कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, तो हॉकर्स नसल्याचे सांगत मनपा कर्मचाऱ्यांनी कारवाईच्या वेळेस करण्यात आलेले व्हिडिओ शूटिंगही पोलिसांना दाखवले. 

बातम्या आणखी आहेत...