आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालुका पोलिस ठाण्यासमोर अपार्टमेंटमध्ये घरफोडी, ; चाेरटा सीसीटीव्हीत कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तालुका पोलिस ठाण्यासमोरील अपार्टमेंटमध्ये चोरट्याने दुपारी साडेचार वाजता धाडसी घरफोडी केल्याची घटना बुधवारी घडली. यात एक मोबाइल सुमारे दहा हजार रुपये चोरट्याने लांबले. चोरट्याच्या सर्व हालचाली अपार्टमेंटमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहे. मात्र, चोरट्याने पोलिस ठाण्यासमोरच घरफोडी केल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

 

तालुका पोलिस ठाण्यासमोर नंदा रेसिडेन्सी अपार्टमेंट आहे. यातील पहिल्या मजल्यावर ‘दिव्य मराठी’चे उपसंपादक नीलेश दिलीप भदाणे हे फ्लॅट क्रमांक १०३ मध्ये गेल्या १५ दिवसांपूर्वीच राहण्यासाठी आले होते. बुधवारी ते पत्नीसह पिंप्राळा आठवडे बाजारात जात असताना ३५ ते ४० वयोगटातील अनोळखीने ४.१५ वाजता अपार्टमेंटमध्ये जिन्याने प्रवेश केला. त्यांना पाहून तो तिसऱ्या मजल्यावर गेला. त्यानंतर तो काही वेळाने पुन्हा पहिल्या मजल्यावर परतला. तोपर्यंत भदाणे हे घराला कुलूप लावून निघून गेले होते. त्यानंतर लगेच चोरट्याने त्यांच्या घराचे कुलुप लोखंडी पट्टीने तोडून आत प्रवेश केला. घरातच कपाटाच्या ड्रॉवरच्या चाव्या त्याच्या हाती लागल्याने त्याने सर्व ड्रॉवर उघडले. त्यातील महत्त्वाची कागदपत्रे कपडे अस्तव्यस्त फेकले. त्याने एक मोबाइल सुमारे १० हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी भदाणे यांनी पोलिसांत तक्रार दिला आहे.
एेन दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास चोरट्याने डल्ला मारल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...