आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला पाेलिसानी केली अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पत्नी अंजलीस शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल अाहे. याप्रकरणी गुरूवारी रामानंदनगर पोलिसांनी पती दिनेश थाेरात याला अटक केली आहे. 


२ फेब्रुवारी रोजी दुपारी अंजली थोरात यांनी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली होती. आरोपी दिनेश सुरेश थाेरात (रा. मंगलमूर्ती पार्क, देवेंद्रनगर) याचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या कारणावरून ताे पत्नीस कमी लेखत होता. त्याने त्यांचा वांरवार मानसिक व शारीरिक छळ करून पैशांची मागणी करून आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे अंजली यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची फिर्याद अंजली यांचा भाऊ अनुप बहाळकर (रा. धुळे) यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार दिनेश थोरात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दिनेश फरार झाला होता. गुरूवारी पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...