आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयाने पतीने पत्नीला पेटवले; पत्नी 70 टक्के भाजली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- चारित्र्यावर संशय घेत माथेफिरू पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना उजाड कुसुंबा येथे मंगळवारी सकाळी ७ वाजता घडली. यात पत्नी ७० टक्के भाजली आहे. तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे. 


छोटीबाई अशरफ तडवी (वय ३५) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. पती अशरफ मोईनिद्दीन तडवीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत स्वत:च्या किराणा दुकानातून बाटलीत पेट्रोल आणून पेटवून दिले. १४ वर्षीय मुलगी करिना हिने धावपळ करीत आईला पाण्याने विझवले. परिसरातील नागरिकांनी लगेच तिला रिक्षेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. 


पतीला अटक 
घटना घडल्यानंतर छोटीबाई हिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी अशरफ याला उजाड कुसुंबा गावातूनच ताब्यात घेत अटक केली आहे. दरम्यान, छोटीबाई हिची प्रकृती गंभीर आहे. दुपारी २ वाजता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. 

बातम्या आणखी आहेत...