आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये वनविभागाने 60 हजाराचा मुद्देमाल पकडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- प्रादेशिक वनविभागाच्या गस्ती पथकाने कारवाईचा सतत धडाका लावल्याने सागवान लाकुड तस्करांचे धाबे दणाणले आहे.  सातपूड्याच्या पायथ्याशी असलेल्या वड्री येथे कारवाई करीत तब्बल 60 हजारांचे अवैध लाकुड साठा जप्त करण्यात आला आहे. 

 


सातपुड्यातुन अवैधरित्या सागवानासह इतर मौलवान लाकडाची तोड करून त्यापासुन फर्निचर बनविण्याचा मोठा उद्योग आहे. सध्या प्रादेशिक वनविभागाच्या गस्ती पथकाने कारवाईचा धडाका सुरू केल्याने या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. किनगाव येथे कारवाईनंतर बुधवारी वड्री (ता. यावल) येथे प्रादेशिक वनविभाग यावलच्या गस्ती पथकाचेे वनक्षेत्रपाल एस. अार. पाटील, वनरक्षक एस. एस माळी, जगदिश ठाकरे, संदिप पंडीत, संदीप भोई, व योगीराज तेली यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
 

बातम्या आणखी आहेत...