आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतमाल हमीभावाची अंमलबजावणी करा; शेतकरी संघटनेची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- केंद्र सरकारच्या उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या शेतमाल हमी भावाच्या घोषणेची अंमलबजावणी करावी, यासह अन्य विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत अधिकाऱ्यांना निवेदन दिले. 


शेतकरी संघटनेमार्फत कित्येक वर्षापासून नियमन मुक्ती व तंत्रज्ञान स्वातंत्र्याची व्यवहार्य मागणी केली जात आहे. मात्र, सरकार सध्या लोकप्रिय घोषणांनी व्होट बॅंक धोक्यात येवू नये, म्हणून काही अव्यवहार्य निर्णय घेत असल्याची तक्रार संघटनेने निवेदनाद्वारे केली अाहे. शासनाने सरकारी खरेदी केंद्राची गत हंगामाची परिस्थिती पाहता, याबाबत शेतकरीभिमुख नियाेजन करावे, अशी मागणी संघटनेचे विभागप्रमुख कडू पाटील, प्रदीपसिंग परदेशी, पुरुषोत्तम पाटील, दौलत पवार, नाना पाटील, अभिमत राहकर, मनोज परदेशी यांनी केली अाहे. दरम्यान, शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अापल्या मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना सादर केले अाहे. 


या मागण्यांसाठी निदर्शन 
सर्व प्रकारचा व संपूर्ण शेतमाल सरकार खरेदी करेल, याचे हमीपत्र जारी करावे. दर ८ किलोमीटरवर गोदाम उपलब्ध करुन बारदाण देखील द्यावे. उत्पादन खर्च हा महसूल मंडळ निहाय काढण्यात यावा. प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या उपयुक्ततेच्या गरजेचा पुनर्विचार करावा. खरेदी मालाचे २४ तासाच्या आत चुकारे द्यावेत. जिल्हा प्रशासनाने सॅटेलाईट इमेज व्हिव्हचा वापर करुन शेतीचे नियमित आकलन करावे. 

बातम्या आणखी आहेत...