आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घरात लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा झाला कोळसा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर- शॉर्ट सर्किटने घरात लागलेल्या आगीत एका 60 वर्षीय वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. शहरातील बालाजी पुरा भागात ही घटना काल, बुधवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.

 

सूत्रांनूसार, सुमनबाई ईश्वर बाविस्कर(वय-60) या बालाजी पुरा भागातील त्यांच्या घरात मुलगा व सुनेसह राहत होत्या. घटना घडली तेव्हा सून व मुलगा बाहेर गेला होता. घरात अचानक आग लागली आणि त्यात सुमनबाई 100 टक्के भागल्या गेल्या. घरातून धूर निघत असल्याचे पाहून शेजारच्यांना लोकांनी सुमनबाईंच्या घरात धाव घेतली.  

 

याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुमनबाई यांचा मुलगा हातमजुरी करतो.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...