आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल-कोळवद मार्गावर धावत्या अॅपेरिक्षातून विवाहिता कोसळली, जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- कोळवद रस्त्यावर धावत्या अॅपेरिक्षातून पडून महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोवळ आल्याने ही महिला रिक्षातून पडल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज (गुरूवार) दुपारी अडीच वाजेच्या सुमारात घडली.

 

मिळालेली माहिती अशी की, आरेफा रसुल तडवी (वय-38, रा.कोळवद, हल्ली मुक्काम तडवी कॉलनी, यावल) असे मृत महिलेचे नाव आहे. आरेफा या आल्या कुटुंबियासोबत कोळवद येथून गिरडगाव येथील नातेवाईकाकडे कार्यक्रमाला गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून त्या दुपारी शेखर भागवत सपकाळे (रा.कोळवद) याच्या अपॅरिक्षा (एम.एच.19 व्ही. 7038) मधून निघाल्या होत्या. परंतु कोळवद–यावल रस्त्यावर धावत्या रिक्षात आरेफा यांना भोवळ आली आणि त्या थेट रस्त्यावर कोसळल्या. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रिक्षाचालक आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने यावल येथील ग्रामीण रूगणालयात हलवले. परंतु डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून आरेफा यांना मृत घोषित केले.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरिक्षक सुनीता कोळपकर यांनी ग्रामीण रूग्णालयात भेट दिली. तडवी समाज बांधवांनी रूग्णालयात गर्दी केली होती. आरेफा यांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. आरेफा यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करुन पाहा.. संबंधित घटनेचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...