आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी; सात जण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- तालुक्यातील अट्रावल येथे एकाच समाजातील दोन गटात किरकोळ कारणावरून जबर हाणामारी झाली त्यात सात जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजेला घडली. या प्रकरणी परस्परांविरूध्द 16 जणांविरूध्द दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर जखमींना जिल्हा समान्य रूग्णालयात हलवण्यात आले आहे.


अट्रावल येथे गेल्या दोन दिवसापासून एकाच समाजाच्या दोन गटात किरकोळ कारण वरून वाद उफाळत होता मात्र, संबधितांना गावातील नागरीकांच्या मध्यस्थीने वादावर परदा टाकण्यात आला मात्र, शनिवारी दुपारी वाद वाढला व त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले यात एका गटातील फिर्यादी दिवाकर टोपलू तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील बस स्टॅन्ड चौकात असतांना तुषार दिलीप तायडे, रिंकू बोंदरू तायडे, कृष्णा बोंदरू तायडे, शुभम बोंदरू तायडे, भुषण बोंदरू तायडे, विनायक भास्कर तायडे, बोंदरू वसंत तायडे, विक्की मारोती तायडे व बादल अनिल तायडे (सर्व रा.अट्रावल) यांनी त्यांच्या जवळ येवून गावात दारू बंदीची मागणी केल्याचा राग येऊन त्यांना मारहाण करायला लागलेे. यात त्यांच्या बचावाकरीता आलेल्यांना देखील दुखापत झाली त्यामध्ये पदम टोपलू तायडे यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे या हाणामारीत दोन्ही गटातील सात जण जखमी झाले त्यांच्यावर यावल ग्रामिण रूगणालयात डॉ.रश्मी पाटील यांनी प्रथमोपचार करीत जिल्हा समान्य रूग्णालयात हलवण्यात आले आहे. तर दिवाकर तायडे यांच्या फिर्यादी वरून वरिल नऊ संशयीतां विरूद्ध दंगल, जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपनिरिक्षक अशोक आहिरे, हवालदार महेबुब तडवी, संजीव चौधरी, सुशील घुगे करीत आहे

 

दुसरा गुन्हा असा...
या दंगलीत दुसऱ्या गटाकडून कृष्णा बोंदरू तायडे यांच्या फिर्यादी वरून वरील करणावरून पदम टोपलू तायडे, दिवाकर टोपलू तायडे, विशाल सुधाकर तायडे, आकाश सुधाकर तायडे, पवन सोनवणे, सोनु पुर्ण नाव माहित नाही व अशोक गोवर्धन तायडे अशा सात जणां विरूध्द मारहाण करणे, दंगल सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या हाणामारीत दोन्ही गटातील जखमीत पदम टोपलू तायडे हा गंभीर, दिलीप वसंत तायडे,बोंदरू वसंत तायडे, आनंदा भास्कर तायडे, कृष्णा बोंदरू तायडे, दिवाकर टोपलू तायडे व अशोक गोवर्धन तायडे हे सात जण जखमी आहेत

 

पु‍ढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...