आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडा येथील काम प्रभावित करणारे; आमिर खानने साधला गावकर्‍यांशी संवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- राज्यातील विविध जिल्ह्यात मागीत तीन वर्षांत पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रमदानातून पाणी समस्या सोडवण्यात मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील 24 जिल्ह्यात यंदा श्रमदान करण्यात येणार आहे. या श्रमदानात मराठी कलाकारांपासून ते बॉलिवूडचे दिग्गज कलाकार आपला खारीचा वाटा उचलला. यात आलिया भट्ट, अक्षय कुमार, सई ताम्हणकर यासारख्या अनेक कलाकारांनी पानी फाऊंडेशनसाठी श्रमदान केले आहे.

 

जवखेडा येथे गावात नेहमीप्रमाणे श्रमदान सुरू होते. मात्र आपल्या गावात बॉलिवूड अभिनेता आमिर येणार असल्याचे कळताच तिथल्या जनतेत एकच उत्साह संचारला आणि सर्वच जोमाने श्रमदान करु लागले. साधारणतः सकाळी साडेआठच्या सुमारास गावी पोहोचला. धुळे येथून नवलनगर मोहाडीमार्गे जवखेडा पोहोचला. त्यावेळी पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी आमिरने गावाच्या तरुणींनी सादर केलेल्या पाणी फाउंडेशन वरील अहिराणी गीत ‘चैत्र ना महिनामा, जागृत व्हयनाय, जवखेडाना विकास करणाय’ व ‘जुनं सारं विसरूया,जवखेड्याचा विकास करूया’ या गीतांचे मंदिरासमोर सादरीकरण करण्यात आले. गाव विकासाविषयीच्या गाण्यांना आमिर खान व किरण राव यांनी टाळ्या वाजवून भरभरुन दाद दिली.

 

अहिराणी गीताचा अर्थ समजून घेतला व यावेळी गावाचे काम कसे सुरू झाले याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली. नंतर मंडपात दाखल झाला यावेळी गावकऱ्यांनी टाळ्यांनी त्याचे स्वागत केले.

 

यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, डी.वाय. एस.पी.रफिक शेख, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, तहसीलदार प्रदीप पाटील, पाणी फाउंशनचे तालुका समन्वयक विजय कोळी, उज्ज्वला पाटील, युनियन बँकेचे चेअरमन मयूर पाटील, डॉ दिनेश पाटील, सरपंच सुभाष पाटील, प्रा. सुनील पाटील, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील, पं. स. सभापती वजाबाई भिल,अनेक कार्यकर्ते, चाहत्यांची उपस्थिती होती.

 

 

शोष खड्डे गावात जाऊन पाहिले. आमिर गावी पोहोचताच गावातील तरुणांनी एकच घोषणा द्यायला सुरूवात केली. आमिर खान आणि किरण रावही होते. साधारणतः सकाळी साडेआठच्या सुमारास गावी पोहोचला. आमिर गावी पोहोचताच गावातील तरुणांनी एकच घोषणा द्यायला सुरूवात केली.

 

'आम्ही तुमचे गावात आलो आणि खूप छान वाटले. तुमचे काम खूपच छान आहे. छान तुमची टीम आहे . येथील एकजूट कधी कुठे पाहिली नाही, अशा रीतीने मी प्रभावित झाली सर्वात मोठी बाब महिला शक्ती गावात दिसून आली. किती मजबूत शक्ती दिसत आहे. सुंदर तर असे म्हणता येईल. खूप मज्जा आली. जलसंधारणाचे काम करत मनसंधारण झाले. अशा प्रत्येक गोष्टी येथे आहेत. या गावात इतके पॉझिटिव्ह प्रेम दिसते आहे. त्याचा सुगंध आपल्यामध्ये दिसतो. या प्रकारे आपण केलेल्या कामाने प्रेरणा मिळाली आहे. एक आदर्श आमच्यासाठी असा आहे की महाराष्ट्र व देशासाठी हे आदर्श गाव आहे. आणि आदर्श व्हावे यासाठी मी प्रार्थना करीत आहे. स्पर्धेत कोण जिंकते आणि कोण नाही जिंकत याला महत्त्व नाही. प्रत्येक जण पाणी यासाठी काम करीत आहेत. काम करीत रहा. याठिकाणी टीममध्ये 20 लोक आहेत. ते वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ असून त्यांची मदत घेऊन काम सुरु आहे. यामुळे दर्जेदार काम सुरु आहे. शास्त्र आणि संस्कृती याचा संगम साधत हे काम सुरु आहे. रोपवाटिका इतकी सुंदर जगात कुठे पाहिली नाही'.

- आमिर खान

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...