आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातील गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक परदेशींची गोळी झाडून आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे  निरीक्षक रमेशसिंग परदेशी यांनी मध्यरात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेचे नेमके कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी नाशिक येथे अंतिम संस्कारासाठी मृतदेह नेण्यात आला.    


शिवतीर्थ चौकापासून जवळच पाेलिस अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. एलसीबीचे प्रमुख म्हणून काम पाहणारे रमेशसिंग परदेशी यांनी मध्यरात्री पाऊण वाजता स्वत:वर गोळी झाडली.  गाेळीबाराचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नी धावत खोलीमध्ये आल्या. विशेष म्हणजे गस्त व पोलिस ठाण्यात भेट देऊन परदेशी हे काही वेळापूर्वीच घरी परतले हाेते.  श्रीमती परदेशी यांचा हंबरडा ऐकून शेजारी राहणारे चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळ धावत आले. परदेशी यांनी डोक्यावर  उजव्या बाजूने गोळी झाडल्यामुळे खोलीत सर्वत्र रक्त सांडले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक सचिन हिरे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी पिस्तूल जप्त केले आहे. शिवाय रक्ताचे नमुनेही घेतले आहेत. त्याआधारे केमिकल अॅनालायझर ही चाचणी केली जाणार आहे.  त्यानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात निरीक्षक परदेशी यांना दाखल करण्यात आले; परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.  त्यानंतर रात्रीतून हॉटेल व्यावसायिक असलेला त्यांचा मुलगा अमोल व सनदी अधिकारी असलेली मुलगी अमृता यांनी धुळे गाठले.   गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले; परंतु या वेळीही त्यांची मुले अमोल व अमृता बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दुपारी निरीक्षक परदेशी यांचा मृतदेह काही क्षणांसाठी   पोलिस अधीक्षक कार्यालयात अंतिम दर्शनासाठी  ठेवण्यात आला. त्यानंतर दुपारी खासगी रुग्णवाहिकेने  मृतदेह नाशिक येथे नेण्यात आला. दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा..सेवानिवृत्तीनंतर करणार होते हॉटेल व्यवसाय

 

बातम्या आणखी आहेत...