आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीप्रश्नी जाब विचारणाऱ्यास नगरसेवकाच्या मुलांची मारहाण;धुळे महापालिकेतील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- पाणी गळतीच्या समस्येचे वृत्त व्हॉट्सअॅपवर टाकल्याच्या कारणावरून महापालिकेच्या अावारात दाेन गटात गुरुवारी तुंबळ हाणामारी झाली. एका नगरसेवकाच्या दाेन मुलांचा यात सहभाग हाेता. सुमारे अर्धा तास हा गाेंधळ सुरू हाेता. पाेलिसांनी हस्तक्षेप करुन हे प्रकरण मिटवले, त्यामुळे पाेलिसांत याबाबत काेणतीही नाेंद करण्यात अाली नाही. मात्र 

हाणामारीचे लाइव्ह चित्रण साेशल मीडियावर प्रसारित झाले हाेते.


शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये पाइपलाइनला गळती लागली अाहे, त्यामुळे या भागात पाण्याचा प्रश्न उदभवला अाहे. ही गळती दुरुस्त करण्यासाठी  कांॅग्रेसचे नगरसेवक इस्माईल पठाण यांनी बांधकाम विभागात तक्रार दिली हाेती. याच प्रभागातील तौसिफ खाटीक यांनी पाणी गळतीचे फोटो व्हाॅट्सअॅपवर टाकून हे काम रखडल्याबाबत जाब विचारला हाेता. त्यावर गुुरुवारी इस्माईल पठाण यांनी मनपाच्या बांधकाम विभागात जाऊन या कामाची चौकशी केली.

 

तक्रारदार ताैसिफही तिथे अाले हाेते. या दाेघांत तिथे वादावादी झाली.  त्याचवेळी पठाण यांची दोन्ही मुले इम्तियाज व इम्रान यांनी तौसिफ खाटीक याला मनपाच्या आवारातच मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे दुसऱ्या गटाचे लाेकही अाक्रमक झाले व तुंबळ हाणामारी सुरू झाली. पळापळ, धावपळ सुरू झाली. कार्यालय परिसरातील लाेकही भयभीत झाले. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी धाव घेऊन दाेन्ही गटांना शांत केले. तौसिफ, इम्तियाज व इम्रान यांना पोलिस व्हॅनमध्ये बसवून पोलिस ठाण्यात नेले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...