आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीचा पाठलाग करून केला विनयभंग; 4 जणांविरुध्द गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या चार जणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काल (गुरूवार) करण्यात आली आहे.

 

शेगाव तालुक्यातील भोनगाव येथील विद्यार्थिनी शाळेत येण्यासाठी बसने ये जा करीत आहे. मागील काही दिवसांपासून या विद्यार्थिनीचा चार जण पाठलाग करीत होते. दरम्यान 8 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता सदर विद्यार्थिनी केला हिंदी हायस्कुलच्या पाठीमागे असलेल्या डॉ. अमित देशमुख यांच्या हॉस्पिटल जवळून जात असताना आरोपी नंदकिशोर शिंगोटे यांच्यासह चार जणांनी तीचा पाठलाग केला. एवढेच नव्हेतर ती एकटी असल्याचे पाहून तिच्या तोंडाचा जबरीने रुमाल काढून तुला मोबाइल नंबर दिला आहे, तु कॉल का करीत नाही, असे म्हटले. तसेच हा प्रकार घरी सांगितल्यास तुला जीवाने मारून टाकीन, अशी धमकी दिली. दरम्यान काल (गुरूवार) सदर विद्यार्थिनीने शहर पोलिसात धाव घेवून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी नंदकिशोर शिंगोटे याच्यासह त्याच्या तीन मित्रा विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...