आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नघरी पसरली स्मशान शांतता..वऱ्हाडाच्या ट्रकच्या छतावर बसलेले दोघे कोसळले, एक जागीच ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- तालुक्यातील हिंगोणा येथून निघालेल्या लग्नाच्या वऱ्हाडातील ट्रकच्या छतावर बसलेले दोघे कोसळले. या घटनेत 20 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अविनाश जगन्नाथ तायडे असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी घडली. रस्यावरून गेलेली विद्युत तार गळ्यात अडकल्याने हा अपघात घडला

 

सूत्रांनुसार, तालुक्यातील हिंगोणे येथील अनिकेत वसंत तायडे या तरुणाचे वाकोद (ता.जामनेर) येथे मंगळवारी सायंकाळी 4 वाजेला विवाहसोहळा हाेता. या लग्नासाठी ट्रकव्दारे हिंगोण्यावरून सकाळी 11 वाजेच्या सुमारास वऱ्हाड निघाले होते. भालोद-भुसावळमार्गे वाकोदला जात असताना लग्न घरापासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर हिंगोणा-भालोद रस्त्यावर दीड किलोमीटर अंतर पार केल्यावर रस्त्यात आडवी गेलेल्या विजेच्या तारापैकी आर्थिंगची तार ट्रकच्या छतावर बसलेल्या युवकाच्या गळ्यात अडकली. दोघे रस्तावर फेकले गेले. यात अविनाश जगन्नाथ तायडे याचा जागीच मृत्यू झाला आहे तर संतोष बळीराम तायडे (वय-40) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर हिंगोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येवुन जिल्हा समान्य रूग्णालयात हलवण्यात आलेे आहे. मृत अविनाश तायडे याचे पार्थिव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे.

 

या घटनेने लग्नमंडपी दु:खाचे सावट पसरले आहे. अविनाश हा शेतमजुरी करून कुटूंबाचे  पालण पोषण करायचा. त्याच्या पच्छात आई-वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... लग्नघरी पसरलेल्या स्मशान शांततेच फोटो...

बातम्या आणखी आहेत...