आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर मध्‍ये चायनिज अंडी; 24 पैकी 6 अंडी निघाली प्लास्टिकची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- अमळनेरात प्लास्टिकच्या अंड्यांची विक्री हाेत असल्याची तक्रार प्रांताधिकाऱ्यांकडे शनिवारी (दि.१०) करण्यात अाली.  अामदार शिरीष चाैधरी यांच्या संपर्क कार्यालयात कर्मचारी म्हणून संग्राम पाटील हे काम करतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच या भागातील किराणा दुकानावरून २४ अंडी विकत घेतली होती. त्यापैकी ६ अंडी त्यांनी खाल्ली; पण शनिवारी (दि.१०) काही अंडी त्यांनी पाण्यात उकळली. त्यात अंड्यांचे आवरण मुलायम हाेण्याएेवजी टणक लागू लागल्याचे निदर्शनास अाले. त्यानंतर ही अंडी जळू लागली. यातील पिवळा गर हा प्लास्टिकच्या गाेळ्यासारखा दिसू लागला. हा प्रकार संशयास्पद असल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधितांकडे तक्रार दिली. 

 

होऊ शकतात पोटाचा विकार...

प्लास्टिकची अंडी सेवन केल्यामुळे पोटाचे आजार उद्‍भवू शकतात. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार शिरीष चौधरी यांनी केली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...