आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद योगेश भदाणेवर जिवंत देखाव्यासह हृदयस्पर्शी नाटिका, दिली कुटुंबियांना मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा- चहार्डी येथील चहार्डी विद्या प्रसारक मंडळ संचालित, शामराव शिवराम पाटील विद्या मंदिराच्या स्काउट गाइडच्या विद्यार्थ्यानी पाकिस्तानी हल्यात शहीद झालेले भारताचे वीरपुत्र शहीद योगेश मुरलीधर भदाने यांना श्रद्धांजलीवर जिवंत देखव्यासह हृदयस्पर्शी नाटिका "जरा याद करो कुर्बानी" ही नाटिका सादर केली.

 

शहीद योगेश भदाणे यांना सैन्य दलाच्या हेलिकॅप्टरने आणले गेले, तेथून खलाणे (ता.शिंदखेडा) गावी रुग्णवाहिकेद्वारे पुढे नेण्यात आले, अगदी त्याच पद्धतीने उभेहूब जिवंत देखावा विद्यार्थ्यांनी स्टेजवर सादर केला. हजारो प्रेक्षकांना यावेळी आपल्या अश्रूंना वाट करून दिली होती.


या विद्यार्थ्यांनी साकारली भूमिका...
इयत्ता दहावी मधील शुंभागी वारडे हिने शहीद योगेश भदाणे यांच्या आईची तर प्रतिक्षा रवींद्र पाटील हिने शदीद योगेश भदाणे यांच्या बहिणीची भूमिका साकारली. या नाटिकेची संकल्पना व दिग्दर्शन पंकज पाटील यांनी केली. हेलिकॅप्टरचा प्रयोग छायाचित्रकार छोटू वारडे यांनी केला होता.

 

सदर नाटिका पाहून चहार्डी येथील गावकर्‍यांनी सात हजार रोख बक्षीस दिले. बक्षिसाची रक्कम शहीद योगेश भदाणे यांच्या वीर माता यांच्याकडे सुपुर्द करण्याचा मानस मुख्याध्यापक व्ही.आर.
सोनवणे व शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केला आहे.


जळगाव जिल्हा बँकेचे संचालक डॉ.सुरेश पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद योगेश भदाणे यांना श्रद्धांजली दिली. यावेळी चहार्डी विद्या प्रसारक मंडळ अध्यक्ष डॉ.सुरेश शामराव पाटील, चहार्डी ग्रामपंचायत सरपंच उषाबाई रमेश पाटील, नीलम पाटील, मालुबाई कोळी, जी.टी.पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव प्रकाश पाटील, चंद्रकांत पाटील, शालेय समिती चेअरमन डॉ. अनिल पाटील, संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगीत शिक्षक पंकज छगन पाटील आणि शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.


पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. शहीद जवान योगेश भदाणे यांच्यावरील हृदयस्पर्शी नाटिकेचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...