आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारावेर- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकत्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध रावेर कोर्टाने बजावलेले अटक वॉरंट मागे घेण्यात आला आहे. खटल्याचा रितसर समन्स प्राप्त होऊनही दमानिया कोर्टात हजर झाल्या नव्हत्या.
दमानिया यांच्या वकीलांनी शुक्रवारी रावेर कोर्टात हजर होऊन दमानिया यांच्या आजाराचे कारण पुढे करत अटक वॉरंट पुर्नसुनावणीसाठी न्यायाधिशांकडे विनंती केल्याने 7 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीत हजर करण्याच्या अटीने दमानिया यांचे वॉरंट थांबवण्यात आले आहे.
रावेर न्यायालयात भाजप तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध रावेर कोर्टात जून 2017 मध्ये दावा दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीत दमानिया सातत्याने गैरहजर राहिल्याने गुरुवारी न्यायालयाने त्यांचे अटक वॉरंट काढले होते.
दमानीया यांच्या वकीलांनी यावर युक्तीवाद केला यात त्यांनी दमानिया यांना ब्रेस्टचा कॅन्सर झालेला आहे. त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात अाल्या असून त्यांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. युक्तिवाद करुन संदर्भासाठी रूग्णालयाचे कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत. यावरुन आता त्यांना अटक होणार नाही. त्यावर फेरसुनावणी 7 मार्चला होईल. यावेळी त्यांना हजर व्हावे लागणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा... कोण आहेत अंजली दमानिया? खडसेंशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे यांच्या विरोधातही दमानियांनी केले होते गंभीर आरोप...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.