आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूने भरलेला डंपर किनगावजवळ झाडाला धडकला, तीन जण गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावर वाळूने भरलेल्या डंपर झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. बुधवारी रात्री किनगावजवळ ही भीषण अपघात झाला. डंपरच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या जखमींना अक्षरश: कटरने पत्रा कापून बाहेर काढण्यात आले. जखमींअर जळगाव येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास वाळूने भरलेला डंपर (एम.एच.19 झेड 7878)  चालक सचिन कोळी (रा.फुफनगरी, ता.जळगाव) हा अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गाने यावलकडे येत होता.  दरम्यान किनगाव जवळील हॉटेल मनमंदिरसमोर चालकाचा भरधाव वाहनावरील ताबा सुटून डंपर थेट लिंबाच्या झाडावर धडकला. अपघात इतका भीषण होता की, डंपरची कॅबिन चक्नाचूर झाली आणि वाळू या झाडाच्या समोरील दिशेने सुमारे 30 फुट अंतरावर विखुरली गेली. चालक सचिन कोळीसह सागर कैलास पवार (वय-19 रा. फुफनगरी) व अमोल भिल (रा.आमोदा, ता.जळगाव) हे तिघे गंभीर जखमी झाले.

 

अपघाताची माहिती मिळताच पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत पाटील, चंद्रकांत चौधरी, प्रमोद पाटील, संजय पाटील, प्रशांत पाटीलसह नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जेसीबी बोलवून रस्त्यावर विखुरलेली वाळू गोळा करून गॅस कटरच्या मदतीने कॅबिनमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले. नंतर  जखमींना जळगाव येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...