आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक लाभासाठी जयकुमार रावलांनीही अधिसूचनेनंतर 2 हेक्टर जमीन खरेदी केल्याचे उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे/मुंबई- शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी मुंबईतील जेजे रुग्णालयात निधन झाले. दोंडाईचा येथील सोलर पार्क (पूर्वीचा औष्णिक वीज प्रकल्प) प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्याने त्यांनी 22 तारखेला मंत्रालयात विष प्राशन केले होते. धर्मा पाटील यांच्या पार्थिवावर उद्या (मंगळवार) सकाळी 9 वाजता विखरण येथे अंत्यसंस्कार करण्‍यात येणार आहे.

 

खुद्द जयकुमार रावलांनी खरेदी केली जमीन..

औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी जमीन अधिसूचित करण्यात आल्यानंतर एका शेतकर्‍याकडून 2 हेक्टर शेतजमिन खुद्द पर्यटन मंत्री आणि आमदार जयकुमार रावल यांनी खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही जमीन ही रावल यांच्या नातेवाईकांच्या नावे खरेदी करण्‍यात आली आहे. रावल यांनी आर्थिक लाभासाठी विखरणमधील शेतकर्‍याकडूनच जमीन खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे हा व्यवहार झाल्यानंतर सक्तीच्या भूसंपादनाची नोटीसही काढण्यात आली होती.

 

यामुळे वादात सापडला औष्णिक विद्युत प्रकल्प..  
शिंदखेडा तालुक्यातील मेथी व विखरण परिसरात होणार्‍या औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी शासनाने बागायती व जिरायती शेतीसाठी एकच दर निश्चित केला होता. मात्र, काही शेतकऱ्यांना जास्त मोबदला तर काही शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळाल्याने संबंधित प्रकल्प वादात सापडला आहे.

 

विखरण येथील बागायतदार शेतकर्‍यांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादीत करण्‍यात आल्या आहेत. परंतु प्रकल्पाला स्थानिक शेतकर्‍यांकडून आजही विरोध आहे. औष्णिक विद्युत प्रकल्प 3 हजार 300 मेगावॉट क्षमतेचा आहे. या प्रकल्पात 660 मेगावॉटचे पाच संच उभारण्यात येणार असून या प्रकल्पात 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यासाठी जर्मनीने गुंतवणुकीची तयारी दर्शवली असल्याने प्रकल्प तत्काळ साकारण्यावर सरकारचा भर आहे.

 

मेथी व विखरण परिसरात शेतजमीन हस्तांतरणास शेतकर्‍यांचा विरोध आहे.
या प्रकल्पासाठी 946.19 हेक्टर जमिनीची गरज आहे. त्यात महसूल विभागाची 178.03 हेक्टर तर वन विभागाची 32.17 हेक्टर जमीन आहे. उर्वरित जमीन ही खासगी आहे. प्रकल्पासाठी महसूल विभागाची 46.42 हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली असून वनजमिनीसंदर्भात पर्यायी जमिनीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. शेतकर्‍यांकडून संपादित होणार्‍या जमिनीपैकी 396.50 हेक्टर जमीन संपादित करून ताब्यात घेण्यात आली असून उर्वरित 284.03 हेक्टर जमीन संपादनासंदर्भात वाद सुरू आहे. 70 हेक्टर जागेवर वसाहत तर 20 हेक्टर जमीन रेल्वे धक्क्यासाठी वापरली जाणार आहे.

 

जमिनीला 10 लाख रुपये प्रति एकरी दर निश्चित करण्यात आला आहे. बागायती व जिरायती शेतीसाठी एकच दर निश्चित झाला आहे. त्यामुळे जिरायती शेती असलेल्या शेतकर्‍यांनी पूर्वीच शेतजमीन हस्तांतरित केली आहे. दुसरीकडे बागायती शेतकर्‍यांनी बागायती शेतीसाठी वेगळे दर असावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली होती. मात्र विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील लाभापासून वंचित आहेत. जमिनीला योग्य मोबदला मिळवा यासाठी त्यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... जयकुमार यांच्या आणि नातेवाईकांच्या नावे विखरण येथे जमीन असल्याचा सातबाराचा उता80 वर्षीय धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...