आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर उन्हळ्यात शहाद्यात सुसरी नदीला पूर; अवकाळी पावसाने नंदुबार जिल्ह्याला झोडपले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- जिल्हयातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यासह मध्यप्रदेश मधील बडवणी पानसमेल परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला सातपुडयात पडलेल्या पावसामुळे ब्राम्हणपुरी येथील सुसरी नदीला भर ऊन्हाळयात पूर आला आहे तर नंदुरबारात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अन्य भागात ढगाळ वातावरण होते.

 

शहरासह जिल्हाभरात तापमाने चाळीशीच्या वर असल्याने अंगाची लाहीलाही होत होती. परंतू दोनच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरणाने नागरिकांना दिलासा दिला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील दर्‍याखोर्‍यांसह काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला व सुसरी नदीला अचानक पूर पहायला मिळाला

सातपुड्याच्या दर्‍या खोर्‍यातून वाहणार्‍या सुसरी नदीला भर उन्हाळ्यात गुरुवारी अचानक पूर आल्याने ब्राम्हणपुरी येथील नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती.ब्राम्हणपुरी परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे सुरू झाले. त्याचबरोबर तुरळक  पावसाला सुरुवात झाली. उकाडयाने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने थोडा फार दिलासा दिला. परंतु शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले. परिसरात गहू, हरभरे कापून शेतात काढणीवर आलेले पीक केळी, पपई धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच गृहिणीची देखील तारांबळ उडाली.सुसरी धरणाची पाणी पातळी खालावत असल्याने पाण्याचा समस्यला सामोरे जावे लागणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गामध्ये उमटत आहे. परंतु अचानक सुसरी नदीला पूर आल्याने

 

शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. सुसरी नदीला आलेला पूर पाहण्यासाठी अबाल वृध्दांनी  एकच गर्दी केली. पूर आल्याने कुपनलिकेची पाणी पातळी वाढवण्यास मदत होणार आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... भर उन्हाळ्यात शहाद्यातील सुसरी नदीला आलेल्या पुराचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...