आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य साभांळा..धानोर्‍यात 20 तासांत तीन जणांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलकाबाई नामदेव महाजन - Divya Marathi
अलकाबाई नामदेव महाजन

धानोरा- 7 व 8 फेब्रुवारीला 20 तासांच्या अंतरात 3 जणांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या पाच दिवसांत धानोरा येथे पाच जणांचे निधन झाल्याने त्यात अधिकच भर पडली. ह्रदयविकाराच्या रुग्णांनी नियमित तपासणी करावी तसेच योगासणे, व्यायाम करायला हवी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

 

फटाकेवाले नामदेव निंबा महाजन यांच्या पत्नी अलकाबाई नामदेव महाजन (वय-65) यांचे काल (बुधवार) दुपारी तीनच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेनंतर आज (गुरुवार) पहाटे चार वाजता आयुर्वेदाचार्य पप्पु मिश्रा यांचे लहान बंधु शामकांत कृष्णकुमार मिश्रा (वय-50) यांचे ही ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेला काही तास होत नाही तोच सकाळी साडे आठ वाजता सदगुरु मेडीकलचे मालक कांतीलाल पाटील यांचे वडील तुळशीराम सुकदेव पाटील (वय-68) यांचेही ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

 

20 तासांत तीन जणांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन होण्याच्या घटनेमध्ये वाढ होत असल्याने डॉक्टरांनी आरोग्य सांभाळण्याचा सल्ला दिला आहे. यात दररोज व्यायाम,पायी चालणे, योगासणे, आहारावर नियंत्रण तसेच तेलकट पदार्थ खाऊ नये. तर किमान दोन ते तीन महिन्यात आपली शारीरिक तपासणी करावी, ,असा सल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अजित वाडेकर यांनी दिला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...