आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME: पाचोरा येथील विवाहिता 4 वर्षाच्या मुलासह पारोळ्यातून बेपत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा- पाचोरा ‍‍(जि. जळगाव) येथील सासर व धुळे येथील माहेर असलेली 26 वर्षीय महिला आपल्या 4 वर्षीय मुलासह पारोळा बसस्थानक येथून बेपत्ता झाल्याची घटना घडली. महिलेचे वडील सुदाम गोविंदा मुसळे यांनी पारोळा पो‍लिस स्टेशनला याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे.

 

महिलेचे पती भावेश येवले यांनी दिलेली माहिती अशी की, त्यांची पत्नी चेतना भावेश येवले व मुलगा अमेय येवले हे नातेवाईकांच्या लग्नसाठी धुळे येथे 5 दिवसांपूर्वी गेले होते. विवाहसोहळा आटोपून सासर्‍यांनी (सुदाम गोविंदा मुसळे) 23 मे रोजी सकाळी 8 वाजता  दोघांना धुळे-पाचोरा बसमध्ये बसवले. नंतर  चेतनाने पतीला सकाळी 9 वाजता मेसेज केला की, ती सटाणा येथे जात आहे. नंतर 9 वाजून 18 मिनिटांनी फोन करून सांगितले की, माझा विचार बदलला असून मी पारोळा येथे माझ्या ओळखीच्या डॉ.मैत्रिणीला तब्येत दाखवण्यासाठी थांबत आहे. यावरून भावेश यांना शंका आली. त्यांनी 9 वाजून 34 ला चेनता हिला फोन केला असता, तो स्विचऑफ आला. चेतना व अमेय हे पारोळा, पाचोरा व धुळे येथे मिळून नाही. दोघे बेपत्ता झाल्याची खबर सासरे सुदाम मुसळे यांनी पारोळा पोलिस स्टेशन येथे दिली.

बातम्या आणखी आहेत...