आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • किनगाव इचखेडा दुचाकी अपघातातील मृतांचा आकडा दोनवर, इम्रानचा औरंगाबादेत मृत्यू Yawal Accident Two Died

YAWAL: दुचाकी अपघातातील मृतांचा आकडा दोनवर, इम्रान तडवी यांचा औरंगाबादेत मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत इम्रान अरमान तडवी - Divya Marathi
मृत इम्रान अरमान तडवी

यावल- तालुक्यातील किनगाव-इचखेडा गावादरम्यान सोमवारी (25 जून) दुचाकींची समोरासमोर धडक झाली होती. यात तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

शुभम धनराज शिंदे-पाटील (वय-19, रा. लोहारा ता.पाचोरा) याचा मंगळवारी (26 जून)जळगाव येथे निधन झाले. तर इम्रान अरमान तडवी याचा औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना बुधवारी (27 जून) निधन झाले.

 

दरम्यान, किनगाव ते इचखेडा रस्त्यावर 25 जून रोजी 11 वाजेच्या सुमारास किनगाव येथील शुभम धनराज शिंदे-पाटील हा दुचाकीने इचखेड्याकडे जात होता तर इम्रान अरमान तडवी व मुकद्दर कलींदर तडवी (दोघे रा. इचखेडा) हे दुचाकीने किनगावकडे येत होते. दरम्यान दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघातात दोन्ही दुचाकींचा अक्षरश: चुराडा झाला होता. तिघे गंभीर जखमी झाले होते. जखमींना जिल्हा समान्य रूग्णालयात उपचार्थ हलवण्यात आले होते उपचारादरम्यान शुभमची प्राणज्योत मालवली. तर इम्रानची प्रकृती अधिक खालवल्याने त्याला औरंगाबाद येथे उपचार्थ हलवण्यात आले होते. परंतु त्याचे उपचारादरम्यान बुधवारी निधन झाले. इम्रानच्या पार्थिवावर आज (गुरुवार) सकाळी इचखेडा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्‍यात आले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...