आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडप टाकणाऱ्या मुलाचा उच्च दाबाचा शॉक लागून तरुणांचा मुत्यु; महिन्याभरात दुसरी घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा- शहरातील जुना यावल रोडवरील केजीएन कॉलनीत लग्नाचा मंडप टाकत असताना वर हातातील लोखंडी खांब खाली लोंबकणारया अति उच्च दाबाच्या तारांना लागल्याने करंट जागेवरच जळून खाक झाला. महिन्याभरात दुसरी घटना महावितरणच्या गलथान कारभारामुळे घडली असून विरवाडे येथील अनिल गोकुळ धनगर(22)याला जीव गमवावा लागला आहे.

 

शहरातील केजीएन कॉलनी भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नोमान काझी यांच्याकडे भावाचे लग्नाचे रिसेप्शन ता. 29 रोजी असल्याने विरवाडे येथील अनिल गोकुळ धनगर हा मंडप टाकण्याचे काम करताना ज्या ठिकाणी मंडप टाकत होता त्या ठिकाणी खाली लोंबकणारया ताराचा स्पर्श मंडपाच्या खांबाला झाल्याने अनिल धनगर हा जागीच जळून खाक झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

 

दरम्यान, चोपडा शहरात मकर संक्रातीच्या दिवशी ओम नरेंद्र पवार (13) हा देखील पतंग काढताना गच्चीवर अतिउच्च दाबाच्या ताराचा स्पर्श झाला होता. तो गंभीर भाजला गेला होता. 15 जानेवारीला नाशिक येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.त्यामुळे जानेवारी महिन्यात बरोबर 15 दिवसांनी या दोन्ही घटना घडल्या असून महावितरणचा गलथान कारभार पुन्हा चव्हाटयावर आला आहे.

 

घरातील कर्ता होता अनिल

विरवाडे येथील रहिवासी असलेले अनिल गोकुळ धनगर हा घरातील कर्ता मुलगा होता.त्याच्या पच्यात आई,वडील,दोन बहिणी असा परिवार असून मयत अनिल चे वडील गोकुळ धनगर हे गावात प स सभापती आत्मराम म्हाळके यांच्या घरी कामाला आहे.आणि घरातील कर्ता मुलगा गेल्याने विरवाडे गावात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत होते.

 

मयत अनिल धनगर चोपडा पालिकेचे नगरसेवक महेंद्र धनगर यांचा साडूचा मुलगा आहे.घटना घडल्या नंतर प स सभापती आत्मराम म्हाळके,नगरसेवक महेंद्र धनगर,भाजपचे सागर पठार,व विरवाडे ग्रामस्थ आदी मदतीसाठी धावून आले होते.

 

पुढील स्लाइड्डसवर क्लिक करून वाचा... पतंग उडविताना मुख्य विद्युत वाहिनी अंगावर पडून ओम पवारचा मृत्यू

बातम्या आणखी आहेत...