आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल अॅपच्या मदतीने मोफत करता येईल कलचाचणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दहावी, बारावीनंतर करिअरच्या वाटा निवडण्यासाठी विद्यार्थ्यांची कलचाचणी महत्त्वाची ठरते. विद्यार्थ्यांचा मानसशास्त्रीय अभ्यास करुन कल ठरवण्यासाठी शहरातील वेलनेस फाउंडेशनचे संचालक नीलेश गोरे यांनी ‘करिअर अॅप्टीट्यूड प्रो’ हे मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषेतील मोबाइल अॅप विकसीत केले आहे. पूर्णपणे मोफत असलेल्या या अॅपद्वारे पालकांना आपल्या मुलांच्या करीअर संदर्भात मार्गदर्शन मिळवता येणार आहे.


करिअर अॅप्टीट्यूड प्रो एक खास मानसशास्त्रीय कल चाचणी करणारे अॅप अाहे. गोरे करियर काउंसेलिंग आणि मानसशास्त्रीय समुपदेशनाचे काम गेल्या आठ वर्षांपासून करत आहेत. राज्यभरात सर्वप्रथम तीन भाषांमध्ये कलचाचणी देणारे पहिले अॅप गोरे यांनी विकसित केले आहे. अँड्राइड स्टुडीओ, जावा स्क्रिप्ट, जे क्युरी, गुगल टूल्स आणि एचटीएमएल - ५ यांच्या सहाय्याने या अॅपचे प्रोग्रॅमिंग करण्यात आले. या अॅपमध्ये ३२० पर्याय देण्यात आले असून त्याद्वारे मानसशास्त्रीय पडताळणी करता येईल. या अॅपद्वारे व्यक्तीमत्व मूल्यमापन चाचण्या. व्हीज्युअल सायकॉलॉजीवर आधारीत अशा पाच चाचण्या आहेत व त्या पूर्णपणे मोफत आहेत. या टेस्ट वरून स्वतःमधील गुण-दोष आणि सक्षमता ओळखता येणार आहे. पाचही टेस्ट अगदी सोप्या आणि मनोरंजक असून व्यक्तिमत्वाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या तसेच प्रकाश टाकणाऱ्या आहेत. यातून मिळणाऱ्या माहितीतून करिअरमधील यश द्विगुणीत होणार आहे. विद्यार्थ्यांची अभाषिक बुद्धिमत्ता मापन, जनरल अॅपट्युटूड, कल-शोधन (इंटरेस्ट), समायोजन (ॲडजेस्टमेंट), इमोशनल क्वोशंट इ. बाबींवर कल चाचणी आधारित असते.


दोन चाचण्यांमध्ये तीन महिन्यांचे अंतर
अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी केलेली चाचणी म्हणजे अॅप्टिट्यूड टेस्ट होय. मात्र, पूर्वग्रहदूषित मनाने ही टेस्ट न करता जो कल आढळेल तो स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा संदेश या अॅपद्वारे देण्यात आला आहे. अॅप्टिट्यूड टेस्टच्या निकालावर विश्वास न ठेवता पुन्हा चाचणी द्यायची असेल तर दुसरी चाचणी तीन महिन्यांनी करता येईल. 


मेलद्वारे मिळेल रिपोर्ट
चाचणीचे रिपोर्ट इ- मेल ने मिळवता येतील. फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता मानसशास्त्रीय चाचणी प्ले स्टोरवर करिअर अॅप्टीट्यूड अॅपवर उपलब्ध आहे. आजवर ६०० विद्यार्थ्यांनी चाचणी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...