आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- महापालिका प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केलेल्या रात्रीच्या अतिक्रमण हटाव माेहिमेला लवकरच सुरुवात हाेणार अाहे. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर असलेले हाॅकर्सचे अतिक्रमण सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत काढले जाईल. यासाठी २७ कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात अाले असून एमअायडीसीतील फायर अाॅफिसमध्ये जप्त साहित्य ताेडले जाणार अाहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर व्यवसाय न करण्याचे अादेश दिल्यानंतरही बळीरामपेठ, सुभाष चाैक, टाॅवर, नेहरू चाैक, चित्रा चाैक ते काेर्ट चाैक यासह शहरातील मुख्य रस्त्यांवर दुकाने लावले जात अाहेत. वारंवार जप्ती व सूचना देऊनही उपयाेग हाेत नसल्याने अाता पुन्हा कारवाईचा धडाका लावला जात अाहे. पालिका कार्यालयाची वेळ संपल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी मुख्य रस्त्यांवर दुकाने लावली जात अाहेत. त्यामुळे पालिकेच्या नियमावलीला धक्का पाेहचत असल्याचे सांगण्यात अाले. एखाद दाेन हाॅकर्समुळे नियमांना हरताळ फासला जात असल्याने अाता काेणाचीही गय न करता पुन्हा जप्ती व साहित्य ताेडण्याची कारवाई केली जाणार अाहे. या माेहिमेत सायंकाळी ६ ते ११ या वेळेत मुख्य रस्त्यांवर कारवाई करून जप्ती केली जाणार अाहे. अपर अायुक्त राजेश कानडे हे स्वत: या प्रसंगी हजर राहणार अाहे.
जेसीबीने ताेडणार साहित्य
शहरात दुसऱ्यांदा सायंकाळची कारवाई केली जाणार अाहे. यापूर्वी रात्री १२ वाजेनंतर जप्तीची कारवाई करण्यात अाली हाेती. त्यानंतर दिवसा हाॅकर्सचे साहित्य जप्त करून ते जेसीबीने ताेडण्यात अाले हाेते. अाता सायंकाळी ६ वाजेनंतर मुख्य रस्त्यांवरील हाॅकर्सविरुद्ध माेहीम उघडण्यात येणार अाहे. जप्त केलेले साहित्य एमअायडीसीतील फायर अाॅफीस येथे नेऊन ते ताेडले जाणार अाहे.
रेल्वेस्थानकावरील हाॅकर्सची मुदत संपली
रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटरपर्यंत व्यवसाय करण्यास बंदी घातली अाहे. त्यामुळे स्थानकाच्या परिसरातील २० हाॅकर्सला यापूर्वीच नाेटीस बजावली असून २३ राेजी एक महिना पूर्ण हाेणार अाहे. त्यामुळे लाऊड स्पीकर लावून व्यवसाय न करण्याची घाेषणा देण्यात येणार अाहे. तसेच रेल्वेस्थानक परिसरातील हाॅकर्सला नेहरू चाैकातील जनता बॅंकेच्या पाठीमागील बाेळीत स्थलांतर केले जाणार अाहे. या बाेळीला नाॅनव्हेज गल्ली असे नामकरण करण्याचा विचार सुरू अाहे. तसेच दत्ताचे मंदिर देखील स्थलांतरीत करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या अाहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.